‘हा कोण मला सांगणारा गल्लीतला माणूस’, एकनाथ खडसेंचा नेमका निशाणा कुणावर?

"संजय पवार हा खूप छोटा आणि किरकोळ माणूस आहे. संजय पवार हा आयुष्यात एकही निवडणूक लोकांमधून निवडून आलेला नाही. मी अजित पवार किंवा त्यांच्या मतांवर निवडून आलेलो नाही. तर मी शरद पवार यांच्या मतदानावर निवडून आलेलो आहे", असं एकनाथ खडसे म्हणाले.

'हा कोण मला सांगणारा गल्लीतला माणूस', एकनाथ खडसेंचा नेमका निशाणा कुणावर?
एकनाथ खडसेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 17, 2024 | 10:48 PM

किशोर पाटील, Tv9 प्रतिनिधी, जळगाव | 17 मार्च 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी माजी मंत्री सतीश पाटील आणि अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी केलेल्या दाव्यावर टीका केली. एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणूक लढणार नाही, असं जाहीर केलंय. यावर सून रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळावी म्हणून खडसेंनी निवडणुकीतील माघार घेतली, असं वक्तव्य सतीश पाटील आणि संजय पवार यांनी केलं. “नाथाभाऊने जे मिळवलं आहे ते कष्टाने मिळवलं आहे, मेहनतीने आणि कार्यकर्त्यांच्या बळावर मिळवलं आहे. मी लाचार माणूस नाही. मी लढणारा माणूस आहे आणि लढत आलो आहे. सगळेच दगड का मारायला लागले? याचा अर्थ नाथाभाऊ मजबूत आहे. एक अकेला सबको भारी. तुम चिंता मत करो. मी काय करतो? माझा पक्ष मला सांगेल. हा कोण मला सांगणारा गल्लीतीला माणूस”, असं प्रत्युत्तर एकनाथ खडसे यांनी दिलं. “मला पक्ष विचारेल आणि त्याला उत्तर देईन”, असंही खडसे यावेळी म्हणाले.

“रोहिणी खडसेंनी कधीही लोकसभा डोळ्यांसमोर ठेवलेली नाही. त्या विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे रोहिणीताईंचा विषय येत नाही. सगळे सोडून गेले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेले. मात्र मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच राहिलो. मला आपत्रेची नोटीस आली तरीसुद्धा शरद पवार यांना सोडलेलं नाही. सत्तेसाठी अजित पवार गटात जायला मला वाव होता. मात्र मी पळून गेलो नाही. मी विधान परिषदेचा गटनेता राहिलेलो आहे”, असं एकनाथ खडसे म्हणाले.

‘शरद पवार यांच्यासोबत विश्वासघात केला’

“संजय पवार हा खूप छोटा आणि किरकोळ माणूस आहे. संजय पवार हा आयुष्यात एकही निवडणूक लोकांमधून निवडून आलेला नाही. मी अजित पवार किंवा त्यांच्या मतांवर निवडून आलेलो नाही. तर मी शरद पवार यांच्या मतदानावर निवडून आलेलो आहे. यांनी उलट शरद पवार यांच्यासोबत गद्दारी केली आणि अजित पवार यांचा गट वेगळा केला. शरद पवार यांच्यासोबत विश्वासघात केला. मी महाराष्ट्रातला नेता आहे. राजकीय माणूस आहे. माझी उंचीही अजित पवार यांच्यावर टीका करणे एवढी आहे”, असं खडसे म्हणाले.

‘मी निवडणुकींना घाबरणारा माणूस नाही’

“सतीश पाटील हे माझे मार्गदर्शक आहेत. त्यांनी जे वक्तव्य केले ते गैरसमजाच्या आधारावर केलं. त्यांनी मला विचारलं असतं तर मी त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली असती. माझे दोन ब्लॉकेज शिल्लक आहेत. त्याचे ऑपरेशन करायचं आहे. थेलियम टेस्ट केल्यानंतर सांगितले की ताण घेता येणार नाही म्हणून मी निवडणूक लढवत नाहीय”, असं खडसेंनी स्पष्ट केलं.

“माझ्या या परिस्थितीबाबत मी वेळोवेळी शरद पवार यांना कल्पना दिली होती. त्यावेळी रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झालेली नव्हती. समोर कोणीही असो मी निवडणुकींना घाबरणारा माणूस नाही. आजपर्यंत मी घाबरलेलो नाही. निवडून आलेलो आहे”, असं खडसे म्हणाला.

“मी कुणा कानाकोपऱ्यातून नाही तर सार्वजनिकपणे लोकांमधून निवडून आलेलो आहे. विजयी झालेलो आहे. तब्बल 30 वर्षे मी प्रचंड मताधिक्क्याने निवडून आलोय. मी काही घराणेशाहीने निवडून आलेलो नाही. त्यामुळे सतीश पाटील यांनी उगाच चुकीचं वक्तव्य करून गैरसमज पसरू नये”, असं एकनाथ खडसे म्हणाले.

‘रावेर लोकसभा मतदारसंघात मजबूत उमेदवार असेल’

“एक मजबूत कार्यकर्ता रावेर लोकसभा मतदारसंघात उमेदवार असेल अशा काही माणसांची शिफारस आणि पक्षाकडे केलेली आहे. पुढील दोन दिवसात उमेदवार कोण असेल हे तुमच्यासमोर येईल आणि त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आम्ही अथक प्रयत्न करू”, असं एकनाथ खडसे म्हणाले.

सून रक्षा खडसे यांच्या विरोधात प्रचार करणार का? असा प्रश्न एकनाथ खडसे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे हे एकमेकांच्या विरोधात प्रचार करत आहेत ना? मग आता मला काय अडचण आली? राज्यात अंशी अनेक उदाहरणे आहेत. पक्षाच्या नेत्यांनी मला विचारलं तर मी त्यांना जाब देण्यात बांधलेला आहे. असं कोणीही मला विचारलं तर मी त्यांना उत्तर देण्यास बांधील नाही”, असं एकनाथ खडसे म्हणाले.

“रक्षाताई माझी सून आहे. महाभारतात भीष्माने अर्जुनाला विजयाचा आशीर्वाद दिला होता. मी सर्वांना आशीर्वाद सदिच्छा देणारच आहे. स्मिता वाघ जरी माझे पाय धरायला आल्या तरी तिला शुभेच्छा देईन. राजकारणात मनमोकळं असावं लागतं. मन कोतं राहून चालत नाही”, असं खडसे म्हणाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.