जळगाव दूध संघातल्या अपहारप्रकरणी पहिलं अटकसत्र; खडसे गटाला मोठा धक्का…
जळगाव जिल्हा दूध संघातल्या लोणी आणि दूध पावडरच्या अपहार प्रकरणी पोलिसांनी आज दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे.
जळगावः गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्हा दूध संघावरुन जोरदार राजकारण चालू असल्याचे बोलले जात आहे. या दूध संघाच्या राजकारणावरुन राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावर राजकारण केले गेले असल्याचा आरोप भाजप नेत्यांवर करण्यात आला होता. त्यातच जळगाव जिल्हा दूध संघातल्या अपहार प्रकरणी पोलिसांकडून पहिलं अटकसत्र करण्यात आल्याने दूध संघाचे राजकारण आणखी तापणार असल्याचे दिसून येत आहे.
जळगाव जिल्हा दूध संघातल्या लोणी आणि दूध पावडरच्या अपहार प्रकरणी पोलिसांनी आज दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे.
दूध संघाच्या व्यवस्थापकीय संचालकांना अटक झाल्याने हा खडसे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय घडामोडींनाही आता वेग येणार असल्याचे बोलले जात आहे.
दूध संघात सुमारे दीड कोटी रुपयांचं लोणी आणि दूध पावडरच्या अपहार प्रकरणी दूध संघ प्रशासनाकडून काही दिवसांपूर्वी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
या तक्रारीच्या तपासात संशयित आरोपी म्हणून व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांच्यासह चौघांचा सहभाग होता असंही स्पष्ट होत असल्याने पोलिसांकडून ही कारवाई करण्यत आली आहे.
मनोज लिमये यांच्यासह चौघांना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले आहेत. या प्रकारामुळे आता नेमकं काय होणार याकडेच साऱ्या जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.