जळगावच्या सर्वात प्रसिद्ध ज्वेलर्सच्या दुकानावर ईडीचा छापा का? राजमल लखीचंदचे मालक बघा काय म्हणाले

"ईडीने तपासा दरम्यान दागिने, रोकड सील करण्याची जी कारवाई केली ती कायदेशीररित्या चुकीचीच आहे. माझ्या नातवांच्या फर्मचा कुठलाही संबंध नसताना, त्यांचीही रोकड तसेच मुद्देमाल सील केली", अशी प्रतिक्रिया ईश्वरलाल जैन यांनी दिली.

जळगावच्या सर्वात प्रसिद्ध ज्वेलर्सच्या दुकानावर ईडीचा छापा का? राजमल लखीचंदचे मालक बघा काय म्हणाले
Follow us
| Updated on: Aug 18, 2023 | 7:19 PM

खेमचंद कुमावत, Tv9 मराठी, जळगाव | 18 ऑगस्ट 2023 : जळगावातील राजमल लखीचंद ज्वेलर्स अतिशय प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील हजारो नागरीक इथे लग्नाचं सोने खरेदीसाठी येत असतात. याशिवाय राज्यभरातून आणि परराज्यातील ग्राहक इथे सोने खरेदीसाठी येत असतात. जळगावचं सोनं हे चांगल्या दर्जाचं असतं, असं मानलं जातं. त्यामुळे अनेकजण फक्त सोने खरेदीसाठी जळगावला जातात. राजमल लखीचंद ज्वेलर्सबद्दल जळगाव जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात एक वेगळी जागा आहे. कारण या ज्वेलर्सच्या दुकानातून सोने खरेदी करणं ही मोठी गोष्ट मानली जाते. हे ज्वेलर्स जळगाव जिल्ह्याच प्रचंड प्रसिद्ध आहे.

या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर आज अचानक ईडीची छापेमारी झाली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ईडीकडून नेमकी कारवाई का करण्यात आली, याविषयी राजमल लखीचंद ज्वेलर्स ग्रुपचे मालक ईश्वरलाल जैन यांनी प्रतिक्रिया दिलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीशी असल्याने कारवाई झाली का? असा प्रश्न पत्रकारांनी जैन यांना विचारल्यानंतर माझे आणि शरद पवारांचे अनेक वर्षांपासून संबंध आहे, अशी प्रतिक्रिया जैन यांनी दिली.

राजकीय दाबावातून ईडीची कारवाई?

“राजकीय दबावातून ही कारवाई झाली, असे मी म्हणणार नाही. शरद पवारांशी अनेक वर्षांपासून संबंध आहेत. मी आजही त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांच्याच पाठीशी राहणार आहे. ईडीने तपासा दरम्यान दागिने, रोकड सील करण्याची जी कारवाई केली ती कायदेशीररित्या चुकीचीच आहे. माझ्या नातवांच्या फर्मचा कुठलाही संबंध नसताना, त्यांचीही रोकड तसेच मुद्देमाल सील केली”, अशी प्रतिक्रिया ईश्वरलाल जैन यांनी दिली.

नेमकं प्रकरण काय?

“मुलाने स्टेट बँकेच्या विरोधात केसेस केल्या आहेत. तो त्या केसेस मागे घेत नसल्यामुळे बँक तडजोड करायला तयार नाही. त्यामुळेच या कारवाईला सामोरे जावे लागत आहे. मात्र जे होईल ते कायद्यानुसार होईल”, असे ईश्वरलाल बाबूजी जैन यांनी म्हटल आहे. “स्टेट बँक ऑफ इंडियाचं हे प्रकरण आहे. त्या प्रकरणात स्टेट बँकेने सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून सीबीआयकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद रद्द व्हावी यासाठी आम्ही हायकोर्टात याचिका दाखल केली आहे आणि त्याच्यावर कामकाज सुद्धा सुरू आहे”, असं जैन यांनी सांगिलं.

“अशाच प्रकारच्या एका प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल समोर आला आहे. यात फॉरेन्सिक ऑडिटची कॉपी ही दिली गेली पाहिजे. तसेच डिफाल्टर अकाउंट घोषित करण्यापूर्वी संबंधिताला संधी दिली पाहिजे, त्या दोन्ही तक्रारदारांसोबत झाल्या नाहीत त्यात संबंधितांची फिर्याद रद्द करण्यात आली”, अशी माहिती जैन यांनी दिली.

“त्याच पद्धतीने आमची सुद्धा अशीच केस असून आम्हाला सुद्धा वारंवार मागणी केल्यानंतरही संबंधित तपासणी करून फॉरेन्सिक ऑडिटची कॉपी देण्यात आलेली नाही. तसेच मला कुठलीही संधी सुद्धा दिलेली नाही. संबंधित तपासणी डायरेक्ट घोषित करून टाकल. त्यामुळे हे नियमाला धरून नाही. नियमबाह्य आहे. सीबीआयच्या फिर्यादीनुसार ईडीने तपास करताना जी कारवाई केली आहे ती मला चुकीची वाटत आहे”, अशी प्रतिक्रिया जैन यांनी दिली.

“माझ्या नातवांच्या नावाने आलेले एंटरप्राइजेस नावाची कंपनी आहे त्याचा आर.एल ग्रुपशी कुठलाही संबंध नाही. त्यांना जबाबदार सुद्धा धरलेले, ते स्वतंत्र आहेत, असं असतानाही त्यांच्याशी संबंधित गोष्टी सुद्धा सिझ केल्या जात आहेत. हे चुकीचे आणि गैर आहे. त्यासाठी मला भांडावं लागणार आहे”, असं ईश्वरलाल जैन म्हणाले.

“15 आणि 16 ऑगस्टला बँक बंद होती. त्यामुळे रकमेचा भरणा झालेला नाही. तसेच हिशोब सुद्धा लिहिला गेलेला नाही. असं असतानाही 87 लाख एवढी जी रोकड होती ती सुद्धा सीज करण्यात आली आहे. हे गैर आहे तसेच चुकीचे आहे”, असं जैन म्हणाले.”तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांकडून जी कागदपत्र मागण्यात आली ती आम्ही त्यांना दिलेली आहेत. तसेच आमची कुणाचीही चौकशी झालेली नाही. आमचे जबाब घेतलेले आहेत. त्यात मी असेल माझा मुलगा मनीष जैन असेल असे आमचे जबाब नोंदवले आहेत”, अशी माहिती त्यांनी दिली.

ईश्वरलाल जैन यांची नेमकी भूमिका काय?

“सोन्यावर कर्ज घेतलं. कर्ज घेतेवेळी चार टक्के व्याज लावण्यात आलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी थेट ते 18 टक्के व्याजदर लावण्यात आले. थेट 14 टक्के व्याजदर हे जास्त लावण्यात आल्यामुळे मी जगायचं कसं? आणि हाच माझा वाद स्टेट बँकेसोबत सुरू आहे. मी तडजोड करण्यासाठी त्यांना प्रपोजल दिलं होतं. हे कर्ज आहे, त्याची 9 वर्षासाठी पुनर्बांधणी करा. मी व्याजासहित पैसे भरायला तयार आहे. मात्र त्यांनी माझा हा प्रस्ताव धुडकावून लावला, माझी तडजोड सुद्धा त्यांना मान्य नाही. मी सांगत असलेल्या गोष्टी त्यांना मान्य नाही” असं ईश्वरलाल जैन यांनी सांगितलं.

“त्यांना तडजोड मान्य नाही कारण त्यांनी काही ठिकाणी चुका केलेल्या आहेत. काही ठिकाणी ते फसलेले आहेत. या विरोधात माझा पुण्यातला मुलगा अमरीश याने त्यांच्यावर केसेस केल्या आहेत. अमरीश यांनी ज्या केसेस केल्या आहेत त्या त्याने मागे घेतल्या पाहिजे. तरंच आम्ही तडजोड करू असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र केसेस मागे घेण्यासाठी अमरीश हा तयार नाही आणि त्यामुळे ते तडजोड करत नाहीय”, असं जैन यांनी सांगितलं.

“ठीक आहे. ते तडजोड करत नाही म्हणून काय झालं, जे व्हायचं आहे ते कायद्याने होईल. मात्र कायदेशीररित्या तपासात ही जी आज कारवाई झाली ती चुकीची आहे. माझे तसेच मुलगा मनीष जैन आणि त्याची दोन्ही मुले अशा सर्वांचे जबाब घेण्यात आलेले आहेत. यानंतर त्यांनी आम्हाला समन्स बजावलेले आहेत. जेवढे दागिने असा रोकड जो स्टॉक होता तो सर्व त्यांनी सील केला आहे”, अशी प्रतिक्रिया जैन यांनी दिली.

“ईडीने आमचा जबाब घेतला आहे आणि मी ईडीला जबाब दिलेला आहे. त्यांनी आम्हाला समन्स देखील दिले आहेत. आम्ही चौकशीसाठी जाणार आहोत. माजी आमदार मनीष जैन तसेच त्यांचे दोघे मुले आणि माझे जबाब ईडीने नोंदवून देखील आम्हला समन्स दिले आम्ही चौकशीसाठी जाणार आहोत”, असंही ते म्हणाले.

मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही.
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.