Jalgaon Rain | हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले, जळगावमध्ये पावसाची दमदार बॅटिंग

जळगाव जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाने समाधनकारक बॅटिंग केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती. पण आता चांगला पाऊस पडल्याने हतनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालीय.

Jalgaon Rain | हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले, जळगावमध्ये पावसाची दमदार बॅटिंग
Follow us
| Updated on: Sep 07, 2023 | 7:41 PM

जळगाव | 7 सप्टेंबर 2023 : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचं पुन्हा आगमन झालंय. त्यामुळे राज्यातील बळीराजाला खूप मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात गेल्या महिन्याभरापासून पाऊस सुट्टीवार गेला होता. शेतकरी चातकासारखी वाट पाहत होते. याशिवाय राज्यातील अनेक धरणांमधील पाणीसाठी संपत आला होता. अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाईचं संकट उभं राहण्याची भीती होती. अशा परिस्थितीत पावसाने आगमन केलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. जळगाव जिल्ह्यातही पावसाने काल रात्री आणि दमदार बॅटिंग केली आहे.

जळगाव जिल्ह्यात चांगला पाऊस पडल्याने हतनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालीय. त्यामुळे हतनूर धरणाचे 4 दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. गेल्या 15 दिवसांपासून पाऊस नसल्याने धरणाचे सर्व दरवाजे बंद होते. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये कालपासून पाण्याची आवक वाढल्याने हतनूर धरणाचे चार दरवाजे एक मीटरने उघडले आहेत. धरणातून 9 हजार 959 क्यूसेक्सप्रमाणे पाण्याचा विसर्ग तापी नदीत सुरु करण्यात आला आहे. हतनूर धरणामध्ये आता 87.63 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

धुळ्यातील नागरिकांनाही दिलासा

दरम्यान, धुळे जिल्ह्यातही पावसाचं आगमन झालंय. धुळे जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस पडलेला नव्हता. जळगाव जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये व्यवस्थित पाऊस पडला होता. पण धुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाऊस पडलेला नव्हता. तिथे पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. ते देवाकडे सातत्याने पाऊस पडावा यासाठी प्रार्थना करत होते. अखेर पावसाने आज आगमन केलं आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, पावसाने राज्यातील अनेक भागांमध्ये महिन्याभरापासून दांडी मारली होती. त्यामुळे सर्वत्र तापमानात प्रचंड वाढ झालेली होती. शेतकऱ्यांची पीकं करपू लागली होती. पिकांवर अनेक रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी प्रचंड संकटात सापडले होते. तसेच नागरिकही उष्णतेने हैराण झाले होते. मात् काल रात्रीपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पावसाच्या प्रतिक्षेत असलेला बळीराजा हा सुकावला आहे. या पावसामुळे पिके तरारली आहेत. पण अद्यापही जिल्ह्याचा काही भाग पावसाच्या प्रतिक्षेत असून बळीराजा पावसाची आस धरून आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.