Jalgaon | जळगावात खडसे आणि महाजन संघर्षात 200 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ, जिल्हा सहकारी दूध संघाचे राजकरण तापले
जळगाव जिल्हा दूध संघातील संचालक मंडळाने मंगळवारी दूध उत्पादकांना 6 कोटींची अदायकी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रशासकीय मंडळाकडून दूध संघातील अतिरिक्त 200 कर्मचाऱ्यांना डच्चू देण्याची तयारी सुरू केलीयं.
जळगाव : खडसे गटाने दुध संघाच्या इमारतीत पत्रकार परिषद घेतली म्हणुन प्रशासकिय मंडळाने (Administrative Board) थेट पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. हे सर्व प्रकरण नवे असतानाच आता जिल्हा सहकारी दूध संघाने अजून एक मोठा निर्णय घेत मोठा धक्काच दिलायं. जळगाव जिल्हा दूध संघातील संचालक मंडळाने (Board of Directors) मंगळवारी दूध उत्पादकांना (Milk producer) 6 कोटींची अदायकी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रशासकीय मंडळाकडून दूध संघातील अतिरिक्त 200 कर्मचाऱ्यांना डिच्चू देण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे आता दूध संघातील 200 कर्मचारी बेरोजगार होणार. मात्र, प्रशासकीय मंडळाकडून घेण्यात आलेल्या निर्णयावर सर्वच स्तरातून टिका होतीयं.
प्रशासकीय मंडळाने दूध संघातील 200 कर्मचाऱ्यांना डिच्चू देण्याचा घेतला निर्णय
जळगाव जिल्हा दूध संघातील संचालक मंडळाने मंगळवारी दूध उत्पादकांना 6 कोटींची अदायकी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रशासकीय मंडळाकडून दूध संघातील अतिरिक्त 200 कर्मचाऱ्यांना डच्चू देण्याची तयारी सुरू केलीयं. याबाबत ऑडिट करून दोन दिवसांच्या आत या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून घेण्याचे आदेश मुख्य प्रशासक मंगेश चव्हाण यांनी दिले आहेत. मंदाकिनी खडसे यांच्या काळात घेण्यात आलेल्या निर्णयाला राजकीय गोटात एकप्रकारे धक्काच मानला जातोयं. मात्र, प्रशासकीय मंडळाकडून घेण्यात आलेल्या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळते आहे.
महाजन आणि खडसे संघर्ष कर्मचाऱ्यांच्या मुळावर
खडसेंचे वर्चस्व असलेल्या जळगाव जिल्हा सहकारी दूध संघावर खडसेंना शह देत शिंदे फडणवीस सरकारने प्रशासकीय मंडळाची नेमणूक केल्याने जिल्ह्यात गिरीश महाजन एकनाथराव खडसे संघर्ष अधिक तीव्र होताना दिसून येत आहे. एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनी दूध संघाच्या प्रशासकीय इमारतीत पत्रकार परिषद घेतल्याने भाजपाचे गिरीश महाजन यांच्या जवळचे अरविंद देशमुख यांनी मंदाकिनी एकनाथ खडसे व खडसे गटाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
दोनच दिवसात ऑडिट करून 200 कर्मचाऱ्यांना काढण्याचे आदेश
मंदाकिनी एकनाथ खडसे व खडसे गटाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केल्याचे प्रकरण नवे असतानाच आता दूध संघातील तब्बल 200 लोकांना कामावरून काढण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. इतकेच नाही तर दोनच दिवसांमध्ये या कर्मचाऱ्यांना काढण्याचे आदेश दिल्याचे देखील कळते आहे. तसेच तत्कालीन कार्यकारी संचालक मनोज लिमये हे नॉट रिचेबल असल्याने शैलेश मोरखेडी यांना प्रशासक मंडळाकडून तातडीने कार्यकारी संचालक पदाची जबाबदारीचे आदेश दिले आहे. यामुळे जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाचे राजकारण चांगलेच तापले आहे. आता मंदाकिनी खडसे व खडसे समर्थक पुढचा निर्णय काय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.