AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्य सरकार म्हणजे एक आंधळा, एक बहिरा, एक मुका असे गांधीजींचे तीन बंदर – गिरीश महाजन

राज्य सरकार म्हणजे एक आंधळा, एक बहिरा, एक मुका असे गांधीजींचे तीन बंदर अशी खरमरीत टीका गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.

राज्य सरकार म्हणजे एक आंधळा, एक बहिरा, एक मुका असे गांधीजींचे तीन बंदर - गिरीश महाजन
गिरीष महाजनImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 4:44 PM

जळगाव : भाजप नेते गिरीश महाजन (Girish MahJan) ठाकरे सरकारविरोधात आक्रमक झालेत, काही वेळापूर्वीच महाजनांनी खडसेंना टार्गेट केलं होतं, आता महावितारणावर (electricity Bill) काढलेल्या मोर्चावेळी महाजनांनी थेट महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला टार्गेट केले आहे. राज्य सरकार म्हणजे एक आंधळा, एक बहिरा, एक मुका असे गांधीजींचे तीन बंदर अशी खरमरीत टीका गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. राज्यात सध्या वीजबिलांचा मुद्दा चांगलाच तापला आहे. महावितरण मोठ्या तोट्यात आहे, त्यामुळे वीजबिलं भरा असे आवाहन ऊर्जामंत्र्यांकडून वारंवार करण्यात येत आहे. तर दुसरीकडे ज्याची बिलं थकली आहेत त्यांची वीज कनेक्शन कापण्यात येत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं ऐन हंगामात मोठं नुकसान होत आहे. आता या वीजबिलांच्या मुद्द्यावरून भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. जळगावात गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात महावितरणावर मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी महाजनांनी राज्य सरकारवर टीका करताना हे वक्तव्य केले आहे.

हे तर गांधीजींचे तीन बंदर

राज्य सरकारला शेतकऱ्यांचे काही देणेघेणे नसून उलट कॅबिनेटमध्ये या सरकारची आपापसात मारामारी सुरू आहे. एक आंधळा एक बहिरा व एक मुका असे गांधीजींचे तीन बंदर हे सरकार असल्याची टीका माजी मंत्री गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर केली आहे. राज्यात एकीकडे परीक्षेचा गोंधळ, एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना दुसरीकडे भ्रष्टाचार सुरु असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्याची हौस करून घेतली मात्र एक दिवस मंत्रालयाची पायरी मुख्यमंत्र्यांनी चढले नाही. आदित्य ठाकरे यांनी साहेब आता मैदानात उतरले असल्याचे म्हंटले आहे. मग दोन वर्षा मुख्यमंत्री कुठे होते? असा सवाल उपस्थित करत दोन वर्षात या राज्याचा वाटोळ झाल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे. ह्या सरकारचे डोकं ठिकाणावर नसल्याची टीका ही गिरीश महाजन यांनी केली आहे.

एकनाथ खडसेंवरही पुन्हा निशाणा

याची युती होती, त्याची युती होती, असं करण्यापेक्षा आपल्या मनगटात जोर पाहिजे’ अशा शब्दांत भाजप नेते गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना जोरदार टोला लगावला आहे. बोदवड नगरपंचायतीच्या निकालानंतर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी बोदवडमध्ये शिवसेना आणि भाजपची छुपी युती असल्याचा आरोप केला होता. त्या आरोपाला गिरीश महाजन यांनी उत्तर दिलंय. खडसेंना टार्गेट करताना गिरीश महाजन पुढे म्हणाले की, तुम्ही विधानसभा हरलात. कोथळीत 4 ग्रामपंचायत सदस्यही तुमचे नाहीत. मुक्ताईनगरमध्ये तुमचा नगराध्यक्ष नाहीये. आता तर बोदवड पण तुमच्या हातून गेलं. तुम्ही भाजपची काळजी करू नका. तुमचंच बघा ना, रडीचा डाव खेळू नका. तुम्ही तुमची राष्ट्रवादी जिवंत ठेवा, भाजपची काळजी करू नका, असा चिमटाही महाजनांनी काढला.

युतीचा पूल बांधायचा असेल तर दोन्ही बाजू योग्य हव्यात, शिवसेनेसोबतच्या युतीबाबत मुनगंटीवार यांचं सूचक विधान

जळगावमध्ये पुन्हा खडसे विरुद्ध महाजन, खडसे म्हणातात महाजनांनी भाजप विकली…तर महाजन म्हणतात…

औरंगाबादेत महाराणा प्रतापांचा पुतळा बसवणारच, कुणीही विरोध करू नये; मंत्री अब्दुल सत्तारांचं खा. इम्तियाज जलील यांना आव्हान!

पंतप्रधान मोदी थेट आदमपूर एअर बेसवर पोहोचले, त्यानंतर..
पंतप्रधान मोदी थेट आदमपूर एअर बेसवर पोहोचले, त्यानंतर...
भारताकडे आता रशियाची S-500 मिसाईल सिस्टीम, S-400 पेक्षा खतरनाक
भारताकडे आता रशियाची S-500 मिसाईल सिस्टीम, S-400 पेक्षा खतरनाक.
...तर ते अ‍ॅक्ट ऑफ वॉर, सिंधू जल करारावरुन पाक मंत्री पुन्हा बरळला
...तर ते अ‍ॅक्ट ऑफ वॉर, सिंधू जल करारावरुन पाक मंत्री पुन्हा बरळला.
अवकाळीचा फटका; भाज्यांच्या दराने गाठली शंभरी, गृहीणींचं बजेट कोलडलं
अवकाळीचा फटका; भाज्यांच्या दराने गाठली शंभरी, गृहीणींचं बजेट कोलडलं.
गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द होणार
गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द होणार.
तीन दिवस सतर्कतेचे; राज्यात बॉम्बब्लास्टची धमकी
तीन दिवस सतर्कतेचे; राज्यात बॉम्बब्लास्टची धमकी.
प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा 20 मेपासून बेमुदत संप
प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा 20 मेपासून बेमुदत संप.
आज दहावी बोर्डाचा निकाल; कुठे बघता येणार निकाल?
आज दहावी बोर्डाचा निकाल; कुठे बघता येणार निकाल?.
भारत-पाकिस्तानमधलं अणूयुद्ध अमेरिकेनं टाळलं, ट्रम्प यांचं मोठं विधान
भारत-पाकिस्तानमधलं अणूयुद्ध अमेरिकेनं टाळलं, ट्रम्प यांचं मोठं विधान.
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान.