लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा जळगावच्या सुवर्ण नगरीवरही परिणाम दिसून आला. बाजारपेठेत सोन्याच्या दारात 700 रुपये तर चांदीच्या घरात तब्बल दोन हजार रुपयांनी वाढ झाली. सोन्याचे दर जीएसटीसह 74 हजार 200 रुपयांवर पोहोचले. तर 90 हजार रुपयांच्या आत असलेली चांदी Gst सह 94 हजार 760 रुपयांवर पोहोचली. लोकसभेच्या निकालानंतर शेअर बाजारात झालेल्या घसरणीमुळे सोन्या-चांदीचे दर वाढल्याची माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली.
देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय जगतातील घडामोडींमुळे सोने-चांदीचे दर वरखाली होत असतात, आता लोकसभेच्या निकालानंतर शेअर बाजारात प्रचंड मोठी घसरण झाल्यामुळे सोन्या चांदीच्या दारावर परिणाम झाला असून सोन्या चांदीचे दर वाढले असण्याची माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली आहे. लोकसभा निकालानंतर सोन्याच्या दरात 700 रुपयांची वाढ होऊन सोने जीएसटी सह 74 हजार 200 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले. तर चांदीच्या दरात २ हजार रुपयांची वाढ झाल्यामुळे 94 हजार 760 रुपयांवर पोहोचले आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने वधारले तर चांदी स्वस्त झाली. 24 कॅरेट सोने 71,986 रुपये, 23 कॅरेट 71,698 रुपये, 22 कॅरेट सोने 65,939 रुपये झाले. 18 कॅरेट 53,990 रुपये, 14 कॅरेट सोने 42,112 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 88,530 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
दोन महिन्यांपर्यंत सराफ बाजारात शुकशुकाट
शेतीची कामे, त्यातच लग्नसराई नाही आणि सोन्या चांदीच्या दरात होत असलेल्या वाढीमुळे जळगावच्या सराफ बाजारात शुकशुकाट आहे. हीच परिस्थिती ऑगस्ट महिन्यापर्यंत राहील असा सुवर्ण व्यावसायिक यांनी अंदाज वर्तविला आहे. मोठी उलाढाल होणार नसल्याने सराफा व्यावसायिकांची पण चिंता वाढली आहे.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.