संजय राऊत काय हेला आहे?, गुलाबराव पाटील यांची जीभ घसरली; सभेपूर्वी राऊत-पाटील यांच्यात जुंपली

बाँड लिहून देतो आरोप सिद्ध झाला तर मी मंत्री पदाचा राजीनामा देतो. आणि नाही सिद्ध झाला तर संजय राऊत यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा.

संजय राऊत काय हेला आहे?, गुलाबराव पाटील यांची जीभ घसरली; सभेपूर्वी राऊत-पाटील यांच्यात जुंपली
Follow us
| Updated on: Apr 23, 2023 | 7:27 PM

खेमचंद कुमावत, प्रतिनिधी, जळगाव : पाचोरा येथे उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. या सभेवरून पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि ठाकरे गटामध्ये चांगलीच जुंपली आहे. संजय राऊत भटकलेला आत्मा नौटंकी माणूस आहे, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली. मी चौकटीत राहून बोलायला लावलं होतं. हा माणूस म्हणतो सभेत या आणि घुसा. नाद खुजे आणि नकटी खिजे संजय राऊत असा माणूस आहे. कुठल्याही गोष्टीला अंगावर घेऊन या. संजय राऊतने शिवसेनेला वेडा केला आहे, असंही गुलाबराव पाटील यांनी म्हंटलं.

महाराष्ट्रात संजय राऊत सर्वांशीच पंगा घेत आहे. संजय राऊत आम्हाला उंदीर म्हणतो पण संजय राऊत काय हेला आहे???, असा सवालही गुलाबराव पाटील यांनी केला. त्यांनाही बोलता येतं. आम्हालाही बोलता येतं. परंतु त्यांनी चौकटीत राहून बोलावं.तीन वर्षात 81 कोटी रुपये खर्च केले. मग 400 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार मी कसा केला असा प्रश्न गुलाबराव पाटील यांनी विचारला. संजय राऊत यांना माझं चॅलेंज आहे एक महिन्यात त्यांनी चौकशी करावी.

हे सुद्धा वाचा

तेव्हा सरकार कुणाचे होते

जळगाव जिल्ह्यात एक कुटका माणूस आहे. त्यांनी ही माहिती संजय राऊत यांना दिली. गुलाबराव पाटलांचा अप्रत्यक्षपणे एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला. मी भ्रष्टाचार केलाय असं संजय राऊत म्हणताय. मग तेव्हा सरकार कुणाचं होतं.

तर राजीनामा देणार

बाँड लिहून देतो आरोप सिद्ध झाला तर मी मंत्री पदाचा राजीनामा देतो. आणि नाही सिद्ध झाला तर संजय राऊत यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा. उलटा चोर कोतवाल को दाटे पुण्याचे आणि ठाण्याचे व्यवहार कसे केले हे मला माहीत आहे.

संजय राऊत यांच काही कलेक्टर असताना काय-काय झालं हे सर्व मला माहीत आहे. संजय राऊत यांनी त्यांच्या औकातीत राहावं. आमच्या तुकड्यांवर मोठा झालेल्याने जास्त बोलू नये. आम्ही आव्हान फक्त संजय राऊत यांच्या बोलण्याला दिले आहे.

जेलमध्ये गेलेले आम्हाला चोर म्हणतात…

संजय राऊत आमची डेड बॉडी काढत होते. कावळ्याच्या शापाने कधी गाई मरता का?, असा प्रश्नही गुलाबराव पाटील यांनी विचारला. दीड वर्ष जेलमध्ये राहिलेला हा एक हजार आठ महामंडलेश्वर साधू श्री संजय राऊत हा चोर जेलमध्ये कसा गेला. स्वतः जेलमध्ये गेले आणि आम्हाला चोर म्हणताय.

संजय राऊतला कोण ओळखतो. आमच्या मतावर मोठे झालेला हा माणूस आहे. संजय राऊत जेलमध्ये राहिलेला चोर माणूस आहे. आणि मला म्हणतो कोरोनामध्ये पैसे खाल्ले. मी 400 कोटींचा भ्रष्टाचार केल्याची ज्या एक डोळ्याने फुटक्या असलेल्या माणसाने तुम्हाला माहिती दिली त्याला विचारा, असा सवालही गुलाबराव पाटील यांनी केला.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.