पुण्यानंतर जळगावातील हिट अँड रन प्रकरणावर प्रश्नचिन्ह, नेत्याच्या पोरानं तिघांना उडवलं

पुण्यातील घटना समोर आल्यानंतर जळगावातही हिट अँड रन प्रकरणावरुन पोलिसांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पुण्यात देखील एका नेत्याच्या पोरानं महिलेसह ३ मुलांना उडवलं. ज्यात चार जण ठार झालेत. ही मुलं देखील दारु पिऊन गाडी चालवत असल्याचा आरोप आहे.

पुण्यानंतर जळगावातील हिट अँड रन प्रकरणावर प्रश्नचिन्ह, नेत्याच्या पोरानं तिघांना उडवलं
Follow us
| Updated on: May 22, 2024 | 11:07 PM

पुण्यानंतर जळगावातही हिट अँड रन प्रकरणावरुन पोलिसांच्या कारभारावर प्रश्न उभे राहत आहेत. बिल्डर आणि एका नेत्याच्या पोरानं महिलेसह तिच्या ३ मुलांना उडवलं. चार जण ठार झाले. धडक देणाऱ्या गाडीतून गांजाही जप्त झाला. मात्र १७ दिवस उलटूनही अद्याप आरोपींचे ब्लड रिपोर्ट आलेले नाहीत. जळगावचे नेतेही यावर गप्प आहेत. पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण देशभर गाजतंय. मात्र असाच प्रकार काही दिवसांपूर्वी जळगावात सुद्धा घडला होता. त्यात सुद्धा बऱ्यापैकी पुण्याच्या घटनेप्रमाणेच साम्य आहे. इथंही दुचाकीला धडक देणारे आरोपी बिल्डरचा आणि राजकारण्याचा मुलगा आहे.

दुर्घनेत चौघांचा मृत्यू

राजकीय आशीर्वादामुळे पोलिसांनी कारवाईस कसूर केल्याचा आरोप होतोय. 7 मे ला ही दुर्घटना घडलीये. राणी चव्हाण नावाच्या आशा स्वयंसेविका इलेक्शन ड्युटी संपवून घरी परतत होत्या. दुचाकीवर त्यांच्यासोबत ७ आणि ४ वर्षांची दोन मुलं आणि १६ वर्षाचा एक भाचा होता. जळगावच्या रामवाडीजवळ एका कारनं दुचाकीला धडक दिली. यात राणी चव्हाण यांच्यासह त्यांच्यासोबतच्या तिन्ही मुलांचा मृत्यू झाला.

कोण आहेत ती मुलं

मिळालेल्या माहितीनुसार ज्या कारनं धडक दिली., त्यापैकी एक जण जळगावच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाचा मुलगा आहे. आणि दुसरा अभिषेक कौल नावाच्या बिल्डरचा मुलगा आहे. अपघातानंतर जमावानं कारमधल्या आरोपींना मारहाण केली. मारहाणीचं कारण देत पोलिसांनी आरोपींना मुंबईतल्या रुग्णालयात भर्ती केलं. अपघातावेळी कारचालक आणि कारमधले इतर जण दारुच्या नशेत होते.

रिपोर्ट यायला इतका उशीर का?

ज्या कारनं धडक दिली त्या कारमध्ये गांजाही सापडलाय. मात्र गाडीत गांजा सापडल्याची कलमं उशिरानं लावली गेली. शिवाय पुण्याप्रमाणेच या प्रकरणातही अपघाताला १७ दिवस होऊनही अद्यापही आरोपींचा ब्लड रिपोर्ट आलेला नाही. सर्वसामान्यांनी अपघात घडल्यावर अशी दिरंगाई होते का. ब्लड रिपोर्ट यायला १७ दिवस लागतात का? पोलिसांवर नेमका दबाव कुणाचा आहे. पुण्याच्या घटनेबरोबरच जळगावकरही हाच प्रश्न विचारत आहेत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.