जळगावात गाडीत गॅस भरत असताना स्फोट, बुलेट दुचाकी चक्क आकाशात फुटबॉलसारखी उडाली

जळगावात गॅस भरत असताना सिलेंडरचा स्फोट झाल्याने ओमिनी गाडी जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत गॅस भरणारे 3 जण आणि एक गाडी मालक असे चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

जळगावात गाडीत गॅस भरत असताना स्फोट, बुलेट दुचाकी चक्क आकाशात फुटबॉलसारखी उडाली
जळगावात गाडीत CNG भरत असताना स्फोट, बुलेट दुचाकी चक्क आकाशात फुटबॉलसारखी उडाली
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 12:52 AM

किशोर पाटील, Tv9 मराठी, जळगाव :  जळगावात ओमनी गाडीत गॅस भरत असताना सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे ओमनी गाडीला आग लागली. तसेच अवैधपण गॅस भरणाऱ्या दुकानालादेखील आग लागली. या आगीत ओमनी गाडी आणि दुकान जळून खाक झालं आहे. तसेच चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. अनेकजण अवैधरित्या गॅस भरतीचा उद्योग करतात. पण शक्यतो तशा चुका टाळायला हव्यात. कारण त्यामुळे मोठ्या अपघाताच्या घटनेला सामोरं जाण्याची नामुष्की ओढावली जाऊ शकते. जळगावात अशीच काहीशी घटना घडली आहे. बेकायदेशीररित्या वाहनात गॅस भरती केल्याने जळगावात ओमनी गाडीला आग लागली आणि मोठा स्फोट झाला. या स्फोटात संबंधित दुकान जळून खाक झालं आहे. तसेच बुलेट दुचाकी चक्क आकाशात फुटबॉलसारखी उडाली. या घटनेत 4 जण जखमी झाले आहेत. तसेच या घटनेमुळे जळगावात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

जळगावात गॅस भरत असताना सिलेंडरचा स्फोट झाल्याने ओमिनी गाडी जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत गॅस भरणारे 3 जण आणि एक गाडी मालक असे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी बेकायदेशीररित्या तसेच अवैध पद्धतीने वाहनात गॅस भरला जात होता, त्यातून ही गंभीर घटना घडली आहे. सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर ओमनी गाडीने पेट घेतला. त्यानंतर भीषण आग लागली. या घटनेत गॅस भरणाऱ्याचे दुकान तसेच एक दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या दुर्घटनेत भाजलेल्या गंभीर चारही जणांना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा

अग्निशामक दलाच्या मदतीने आग आटोक्यात

घटनेची माहिती मिळाल्यावर महापालिकेच्या अग्निशमन दलामे घटनास्थळ गाठत आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत संपूर्ण ओमनी दूचाकी तसेच दुकान पूर्णपणे जळून खाक झाले होते. या स्फोटामध्ये एक बुलेट दुचाकी चक्क आकाशात फुटबॉल सारखी उडाल्याची माहिती सुद्धा प्रत्यक्षदर्शनी दिली आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. संबंधित परिसरात एमआयडीसी पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध पद्धतीने वाहनात गॅस भरण्याचा उद्योग सुरू असल्याची माहिती मिळाली असून, या घटनेनंतर नागरिकांकडून संबंधितांवर कारवाईची मागणी केली जात आहे.

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.