दर तीन-चार मिनिटाला एक बलात्कार, काय देश आहे हा..?; दिग्गज लेखकाचं सद्यपरिस्थितीवर भाष्य…
दिल्लीतील परिस्थिती तर भयानक आहे. दिल्लीसारख्या राजधानी शहरातही रात्री सात नंतर कोणतीही महिला फिरताना दिसत नाही. त्यामुळे आता परिस्थिती बदलणे गरेजेची आहे.
जळगावः ज्या समाजात कला आणि साहित्य सोबत वाढत असते त्या समाजाची उत्क्रांती होत असते. आपली संस्कृती कलेमुळे समृध्द झाली. जेवढे इतर शिक्षण महत्त्वाचे आहे तितकीचे महत्त्वाची कला आहे. त्याच प्रमाणे आपल्या समाजाची प्रगती साधायची असेल तर आपण स्त्रियांना आपण सगळे अधिकार दिले पाहिजेत असे प्रतिपादन ज्ञानपीठकार डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी केले.
यावेळी त्यांनी सांगितले की, महिलांबाबत आपल्या देशात वाईट स्थिती आहे. दर तीन-चार मिनिटाला एक बलात्कार होतो. त्यामुळे हा काय देश आहे का असा सवालही त्यांनी यावेळी केला.
जैन उद्योग समूहाची सेवाभावी संस्था भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे दुसरा व्दिवार्षिक ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार’ वितरण प्रसंगी ते बोलत होते.
ज्ञानपीठ विजेते लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या सडेतोड वक्तव्यामुळे ते नेहमीच येतात. या कार्यक्रमातही त्यानी राजकारणावर भाष्य करत आपल्या देशातील सामाजिक परिस्थितीही मांडली.
यावेळी भारतीय समाजात महिलांवर होत असलेले अन्याय अत्याचाराविषयी बोलताना त्यांनी देशातील सद्यस्थितीवर भाष्य केले आहे.
ज्या प्रमाणे 20 हजार वर्षापूर्वी ज्या प्रमाणे परिस्थिती होती. त्याप्रमाणे स्रियांच्या हातात सगळी सत्ता दिली पाहिजे. तरच आपण काही तरी करू असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
सध्याच्या काळात महिलांसाठी वाईट परिस्थिती आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचे अधिकार मिळत नाहीत. त्यांच्यावर अन्याय अत्याचार प्रचंड प्रमाणात वाढले आहेत.
त्याच बरोबर दिल्लीतील परिस्थिती तर भयानक आहे. दिल्लीसारख्या राजधानी शहरातही रात्री सात नंतर कोणतीही महिला फिरताना दिसत नाही. त्यामुळे आता परिस्थिती बदलणे गरेजेची आहे.
समाजाची आणि आपली परिस्थिती बदलायची असेल तर 20 हजार वर्षापूर्वी ज्या प्रमाणे सर्व अधिकार महिलांच्या हातात होते, त्याच प्रमाणे आपण आता सर्वाधिकार महिलांच्या हातात दिले पाहिजे असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.