Video Jalgaon ShivSena : जळगाव तालुक्यात शिवसेनेला भगदाड, 60 पदाधिकाऱ्यांनी सोपविले जिल्हाप्रमुखांकडे राजीनामे, शिंदे गटात सहभागी

शिंदे गटात इनकमिंग सुरू आहे. जळगाव तालुक्यात शिवसेनेला भगदाड पडले. 60 पदाधिकाऱ्यांनी जिल्हाप्रमुखांकडे राजीनामे सोपविले.

Video Jalgaon ShivSena : जळगाव तालुक्यात शिवसेनेला भगदाड, 60 पदाधिकाऱ्यांनी सोपविले जिल्हाप्रमुखांकडे राजीनामे, शिंदे गटात सहभागी
60 पदाधिकाऱ्यांनी सोपविले जिल्हाप्रमुखांकडे राजीनामेImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jul 17, 2022 | 8:18 PM

जळगाव : राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांचे पडसाद आता जिल्ह्यात व तालुक्यात देखील उमटू लागले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात आमदार संजय राठोड आणि खासदार भावना गवळी कार्यकर्त्यांसह शिंदे गटात सामील झाले. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हीच परिस्थिती आहे. जळगाव जिल्ह्यातही गुलाबराव पाटलांवर त्यांच्या कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवला. जळगाव तालुक्यातील शिवसेनेच्या 60 हून अधिक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना सदस्यपदाचा राजीनामा जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे (Vishnu Bhangale) यांच्याकडे सोपविला आहे. यामध्ये तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण (Rajendra Chavan) यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पवन सोनवणे (Pawan Sonwane) यांचाही समावेश आहे. तालुका कार्यकारिणीतील जवळ-जवळ सर्वच पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे सोपविले. तालुक्यातील अनेक गावांच्या सरपंचांनीदेखील यावेळी माजी मंत्री गुलाबराव पाटील यांना समर्थन दिले आहे.

पाहा व्हिडीओ

गुलाबराव पाटील यांच्यावर विश्वास

जळगाव जिल्ह्याने पुन्हा शिवसेनेला धक्का दिला आहे. शिवसेनेचे प्रमुख कार्यकर्ते ठाकरे गट सोडून शिंदे गटात सहभागी झालेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य तसेच काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला आहे. कार्यकर्ते म्हणाले, जळगाव शहर व ग्रामीणचा विकास महत्त्वाचा आहे. त्यासाठी हे राजीनामे दिलेत. जळगाव ग्रामीणचा विकास करायचा असेल, तर गुलाबराव पाटील यांच्याशिवाय पर्याय नाही. ते शिंदे गटात गेल्यानं त्यांच्यासोबत राहणं आवश्यक आहे. तरच आमच्या भागाचा विकास होणार आहे.

हे सुद्धा वाचा

जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांचा समावेश

राज्यात सर्वत्र शिवसेनेचे दोन गट पडलेत. ठाकरे आणि शिंदे गट. शिंदे गटात इनकमिंग सुरू आहे. जळगाव तालुक्यात शिवसेनेला भगदाड पडले. 60 पदाधिकाऱ्यांनी जिल्हाप्रमुखांकडे राजीनामे सोपविले. हे सर्व पदाधिकारी एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले. तालुकाप्रमुखांसह, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांचाही यात समावेश आहे. शिवसेनेचा राजीनामा देणारे बहुतेक जण हे गुलाबराव पाटील यांच्यावर विश्वास ठेवणारे पदाधिकारी आहेत. आपल्या भागाचा विकास गुलाबराव पाटील करू शकतात. त्यामुळं त्यांच्यासोबत राहण्यासाठी शिवसेनेच्या पदांचे राजीनामे दिल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणण आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.