भरधाव दुचाकीवरचा ताबा सुटला, थेट डंपरमध्ये घुसले, आणि…, जळगाव हादरलं

जळगावात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले आहेत. हे दोन्ही तरुण दुचाकीने जात होते. दुचाकीचा वेग जास्त होता. अखेर दुचाकी चालवणाऱ्या तरुणाचा ताबा सुटला आणि त्याने समोर येणाऱ्या डंबरला जोराची धडक दिली. या धडकमुळे भीषण अपघाताची घटना घडली.

भरधाव दुचाकीवरचा ताबा सुटला, थेट डंपरमध्ये घुसले, आणि..., जळगाव हादरलं
Follow us
| Updated on: Dec 19, 2024 | 7:19 PM

जळगावातील फुफनगरी फाट्याजवळ डंपर-दुचाकीच्या भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. तरुणाचा ताबा सुटल्याने भरधाव दुचाकीने समोरून येणाऱ्या डंपरला जोरदार धडक दिली. त्यामुळे हा भीषण अपघात घडला. या अपघातात पंकज शंकर कोळी (वय – २६ वर्ष) आणि अमोल आनंदा कोळी (वय – २७ वर्ष) अशी दोन्ही मयत तरुणांची नावे आहेत. दोन्ही मयत तरुण हे जळगाव तालुक्यातील घार्डी या एकाच गावचे रहिवासी आहेत.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी नागरिकांनी मदतकार्याला सुरुवात केली. जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी देखील घटनास्थळी धाव घेतील. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच दोन्ही तरुणांचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले आहे. या संदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

अकोल्यात शिवशाही बसची मोठी दुर्घटना टळली

दरम्यान, अकोल्यात शिवशाही बसची मोठी दुर्घटना सुदैवाने टळली आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूरवरून अकोल्याला येणाऱ्या शिवशाही बसचे ब्रेक अचानक निकामी झाले होते. यावेळी बस चालकाच्या समयसूचकतेमुळे मोठा अपघात टळला. ब्रेक निकामी झाल्यानंतर चालकाने बस बंद पडलेल्या पेट्रोल पंपात घुसवल्याने मोठा अनर्थ टळला. अकोल्यातील अशोक वाटिका चौकात ही घटना घडली. बसचालक मनोज तायडे यांच्या समयसूचकतेचं लोकांकडून कौतुक होत आहे.

हे सुद्धा वाचा

चालकाचे नियंत्रण सुटले, स्कॉर्पिओ थेट कालव्यात कोसळली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही अपघाताची एक घटना समोर आली आहे. दोडामार्गातील साटेली-भेडशी भोमवाडी येथील कालव्यात गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे स्कॉर्पिओ गाडी थेट कालव्यात कोसळली. या अपघातात गाडीतील एका महिलेचा मृत्यू झाला. या अपघातानंतर स्थानिकांनी धाव घेत गाडी कालव्याच्या बाहेर काढली. मात्र या गाडीतील एका महीलेचा मृत्यू झाला तर चालक किरकोळ जखमी झाला आहे.

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही गाडी कुडासे गावाच्या दिशेने जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगतच्या कॉजवेला धडकली आणि थेट कालव्यात कोसळली. यावेळी गाडीत असणाऱ्या महिलेला गंभीरपणे दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला तर चालक किरकोळ जखमी झाला.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.