चाळीसगाव धुळे रस्त्यावर एका स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला आहे.
या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी झाले आहेत.
हा अपघात इतका भीषण होता, की स्विफ्ट गाडीचा अपघातात पूर्णपणे चुराडा झाला आहे.
अपघातात एका व्यक्तीला जबर मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
दरम्यान, दोघा गंभीर जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.