जळगावात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, 2 मजुरांचा होरपळून मृत्यू, प्रचंड आवाजाने शेतकरी हादरले
भुसावळ तालुक्यातील बेलव्हाय- सूनसगाव रोडवरील केमिकल कंपनीता हा भीषण स्फोट झाला. कंपनीतील ऑइलच्या टाकीला वेल्डिंग सुरु असताना इलेक्ट्रिक वायरची स्पार्किंग झाली आणि स्फोट झाला.
जळगावः जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या एका केमिकल कंपनीत आज शुक्रवारी दुपारी भीषण स्फोट झाला. एका ऑइलच्या टाकीला वेल्डिंग केले जात असताना अचानक स्पार्किंग झाल्याने हा स्फोट झाला. स्फोटामुळे घटनास्थळाला आग लागली. या आगीत दोन मजुरांचा होरपळून मृत्यू झाला. या स्फोटाचा आवाज एवढा भीषण होता की आजूबाजूच्या शेतात काम करणारे शेतकरीही हादरले. त्यांनी घाबरून घटनास्थळावर धाव घेतली.
दुपारी 12.30 वाजता स्फोट
भुसावळ तालुक्यातील बेलव्हाय- सूनसगाव रोडवरील केमिकल कंपनीता हा भीषण स्फोट झाला. कंपनीतील ऑइलच्या टाकीला वेल्डिंग सुरु असताना इलेक्ट्रिक वायरची स्पार्किंग झाली आणि स्फोट झाला. दिया कॉपर मास्टर अलायन्स अँड कंपनी या कंपनीत सदर घटना घडल्याची माहिती हाती आली आहे. स्फोटामुळे लागलेल्या आगीत दोन मजूर होरपळून मृत्यूमुखी पडले. यापैकी एक मजूर भुसावळ येथील असून दुसरा मजूर मध्य प्रदेशातील रहिवासी होता असे स्पष्ट झाले आहे.
भुसावळ पोलीस घटनास्थळ
शुक्रवारी दुपारी झालेल्या या स्फोटाचा आवाज प्रचंड मोठा होता. त्यामुळे आजूबाजूचे शेतकरीही धावत आले. दरम्यान भुसावळ पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली असून घटनास्थळावर ताबडतोब बचावकार्य सुरु करण्यात आले. नागरिकांनी येथील आग विझवून जखमींना रुग्णालयात भरती केले.
इतर बातम्या-