Jalgaon Gold And Silver : अर्थसंकल्पानंतर प्रथमच जळगावच्या सराफ बाजारात सोने ७२ हजारांच्या पुढे, इतका वाढला भाव, चांदीने घेतली भरारी

Jalgaon Gold And Silver Price : अर्थसंकल्पानंतर प्रथमच जळगावच्या सराफ बाजारात सोन्याने ७२ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सोन्याच्या दरात तब्बल १६०० रुपयांची झाली वाढ तर दीड हजाराने चांदीचे दर सुद्धा वधारले आहे. सोन्याचे ७२ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे. तर चांदीचे दर ८४ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचले.

Jalgaon Gold And Silver : अर्थसंकल्पानंतर प्रथमच जळगावच्या सराफ बाजारात सोने ७२ हजारांच्या पुढे, इतका वाढला भाव, चांदीने घेतली भरारी
जळगावमध्ये सोने ७२ हजारांच्या घरात
Follow us
| Updated on: Aug 18, 2024 | 9:58 AM

सीमाशुल्क कपातीच्या घोषणेनंतर घसरण झालेल्या सोन्याच्या भावात पुन्हा वाढ सुरू होऊन शनिवारी सोने एक हजार ६०० रुपयांनी वधारले. त्यामुळे अर्थसंकल्पानंतर २५ दिवसांनी सोने पुन्हा एकदा ७२ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे. चांदीच्याही भावात शनिवारी एक हजार ५०० रुपयांची वाढ होऊन ती ८४ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.

गेल्या आठवड्यापासून दरवाढीचे सत्र

गेल्या आठवड्यापासून हे भाव पुन्हा वाढू लागले. त्यात अमेरिकेतील बँकांची स्थिती व इतर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम होऊन शनिवारी सोन्याच्या भावात थेट एक हजार ६०० रुपयांची वाढ होऊन ते ७२ हजार ३०० रुपयांवर पोहोचले. यापूर्वी २३ जुलै रोजी सकाळी सोने ७२ हजार १०० रुपयांवर होते. दुसरीकडे ८३ हजारांवर असलेल्या चांदीच्या भावात शनिवारी एक हजार ५०० रुपयांची वाढ झाल्याने ती ८४ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली. अमेरिकेतील बँकांची स्थिती व इतर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम झाल्याने सोने चांदीची दरात वाढ झाल्याची सराफ व्यावसायीकांनी माहिती दिली.

हे सुद्धा वाचा

१४ ते २४ कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), २४ कॅरेट सोने ७०६४, २३ कॅरेट ७०,३२१, २२ कॅरेट सोने ६४,६७३ रुपयांवर घसरले. १८ कॅरेट आता ५२,९५३ रुपये, १४ कॅरेट सोने ४१,३०३ रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव ८१,५१० रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक ८९५५६६४४३३ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.