Jalgaon Gold : सोने-चांदीची जोरदार मुसंडी; अवघ्या 48 तासांत अशी घेतली भरारी, ग्राहकांच्या तोंडचे पळाले पाणी

Jalgaon Gold Rate : गेल्या पाच वर्षांच्या काळात पहिल्यांदाच 48 तासांमध्ये सोने आणि चांदीने मोठी भरारी घेतली. या दरवाढीमुळे सुवर्णनगरीत ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. शुक्रवारपासून या दोन्ही मौल्यवान धातूत उसळी आली आहे. आता अशा वधारल्या किंमती?

Jalgaon Gold : सोने-चांदीची जोरदार मुसंडी; अवघ्या 48 तासांत अशी घेतली भरारी, ग्राहकांच्या तोंडचे पळाले पाणी
सोने आणि चांदीचा भाव काय
Follow us
| Updated on: Sep 15, 2024 | 3:08 PM

गेल्या पाच वर्षांच्या काळात पहिल्यांदाच 48 तासांमध्ये चांदीच्या दरात 4 हजार रुपये पेक्षा जास्त तर सोन्याच्या दरात 2 हजार रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. अनेक वर्षात पहिल्यांदाच 48 तासाच्या काळात चांदी आणि सोन्याच्या दराची ही मोठी उच्चांकी झेप असल्याचा दावा सुवर्ण व्यवसायिकांनी केला आहे. जळगावच्या सराफा बाजारात गेल्या 48 तासात मोठा उलटफेर झाला.

सकाळीच झाला मोठा उलटफेर

शुक्रवारी चांदीच्या दरात 4,400 रुपयांनी वाढ झाली. तर सोन्याचे दर 1 हजार रुपयांनी वाढले. सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी चांदीमध्ये 1600 रुपयांनी तर सोन्याच्या दरात 200 ची दरवाढ झाली. चांदी 88 हजार 600 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. दुसरीकडे सोने 200 रुपयांनी वधारून ते 74 हजार 100 रुपये प्रति तोळा झाला. चांदी 89 हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. दुसरीकडे सोन्याने पण भरारी घेतली आहे.

हे सुद्धा वाचा

अमेरिकन अर्थव्यवस्था अधिकच डळमळत असल्याने बँकांचे व्याजदर आणखी कमी होण्याच्या शक्यतेने सोने-चांदीत गुंतवणूक वाढत असल्याने सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असल्यास सुवर्णव्यवसायिकांचं म्हणणं आहे. आगामी काळामध्ये सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 73,044, 23 कॅरेट 72,752, 22 कॅरेट सोने 66,908 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 54,783 रुपये, 14 कॅरेट सोने 42,731 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 86,111 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.