Jalgaon Gold : जळगाव सराफा बाजारात चांदी वधारली, सोन्याने घेतली भरारी
Jalgaon Sarafa Bazaar : जळगावच्या सराफा बाजारात चांदी दोन दिवसांत चांगलीच चमकली. तर सोन्याने पण दरवाढीची झेप घेतली. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सोने आणि चांदीत चढउतार दिसून आले. या दोन दिवसांत भाव वधारले.
जळगाव येथील सुवर्णनगरीत गेल्या दोन दिवसांत सोने चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.10 जुलै रोजी चांदीचा दर हा 92 हजारांवर होता. आता आज चांदीचा दर 12 जुलै रोजी 94 हजारांवर पोहचला आहे. तर सोन्याचा दरही 10 जुलै रोजी 72,500 रुपये इतका होता. तर आज सोन्याचा भाव 73000 वर पोहोचला आहे. दोन दिवसांत सोने आणी चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, दरातील ही चढ-उतार आठवडाभर राहण्याचा अंदाज आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने उतरले तर चांदीची भरारी दिसली. 24 कॅरेट सोने 72,563 रुपये, 23 कॅरेट 72,273 रुपये, 22 कॅरेट सोने 66,468 रुपये झाले. 18 कॅरेट 54,422 रुपये, 14 कॅरेट सोने 42,449 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 92,204 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.
मेकिंग चार्ज कसा होतो निश्चित
ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते. दागिने तयार करताना त्यावर किती सुबकपणे डिझाईन तयार करण्यात आली आहे. किती खुबीने दागिने तयार करण्यात आले आहे. त्यावर हे शुल्क आाकारण्यात येते. जितके आकर्षक, चित्तवेधक आणि बाराकाईने डिझाईन तयार करण्यात येते. तेवढाच त्यावरील मेकिंग चार्ज जास्त असतो. साधारण डिझाईन असेल तर कमी शुल्क आकारण्यात येते