Jalgaon Tempo Video : आररररर…..टेम्पो डोंगरावरून सुटला तो थेट दरीत कोसळला, चित्रपटालाही लाजवेल असा थरार कॅमेऱ्यात कैद

या व्हिडिओचे सत्यता तपासली असता दहा दिवसापूर्वी कन्नड घाटात महिंद्रा पिकप गाडीचे ब्रेक फेल झाल्याने वाहन चालकाने अपघात टाळण्यासाठी महिंद्रा पिकअप दरीत सोडून दिला होता.

Jalgaon Tempo Video : आररररर.....टेम्पो डोंगरावरून सुटला तो थेट दरीत कोसळला, चित्रपटालाही लाजवेल असा थरार कॅमेऱ्यात कैद
टेम्पो डोंगरावरून सुटला तो थेट दरीत कोसळलाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 7:10 PM

जळगाव : चित्रपटात आपण अनेक थरारक सीन (Thrilling Scene) बघत असतो. हा थरार आणि या घटना खोट्या आहेत. हे आपल्याला माहिती असतं. गाड्या डोंगरावरून कोसळणारे तर कित्येक सीन आजपर्यंत तुम्ही पाहिले असतली. मात्र जळगावात (Jalgaon Accident) हा थरार खराखुरा पहायला मिळालाय. हा व्हिडिओ एखाद्या चित्रपटाच्या थराराला लाजवेल असाच आहे.  चाळीसगावच्या कन्नड घाटात महिंद्रा (Mahindra) पिकअप खोल दरीत कोसळताना काळजाचे ठोके उडवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. या व्हिडिओचे सत्यता तपासली असता दहा दिवसापूर्वी कन्नड घाटात महिंद्रा पिकप गाडीचे ब्रेक फेल झाल्याने वाहन चालकाने अपघात टाळण्यासाठी महिंद्रा पिकअप दरीत सोडून दिला होता. मात्र या अपघातात कुठलीही जीवित आणि झाली नव्हती अशी माहिती वाहतूक पोलिसांना दिली आहे.

पिकअप कोसळतानाचा व्हिडिओ

व्हिडिओत नेमकं काय?

एका खोल दरीत महेंद्र पिकप कोसळताना एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. ह्या व्हिडीओ ची सत्यता तपासली असता हा व्हिडीओ जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटातील असल्याची माहिती मिळाली आहे. दहा दिवसापूर्वी याच महिंद्रा पिकप गाडीचा चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाट येथील मेणबत्ती पॉईंट जवळ ब्रेक फेल झाले. अचानक ब्रेक फेल झाल्याने काय करावं हे चालकालाही कळेना, त्याच्याकडे खूपच कमी पर्याय उपलब्द होते. एक तर जीव वाचवून बाहेर पडण्याचा आणि दुसरा म्हणजे पिकअप सोडून देण्याचा, चालकाने प्रसंगावधान दाखवत अपघात टाळण्यासाठी पिकअप गाडी मधून उडी घेऊन पिकअप गाडी खोल दरीत सोडून दिली.

सुदैवाने कोणतीही जिवीतहानी नाही

हा पिकप दरीत कोसळत असताना बस मधील काही लोकांनी या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण केले व गेल्या दोन दिवसापासून पिकप दरीत कोसळताना चे व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहेत. या संदर्भात वाहतूक पोलिसांना विचारणा केली असता ही घटना दहा दिवसांपूर्वी घडली असून या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. हा व्हिडिओ बारकाईने पाहिल्यास जसं चत्रपटातलं दृष्य असतं, एखादं वाहन दरी कोलांट्या खात कोसळतं, तसाचा हा पिकअपक दरीत कोसळत आहे. दुसरीकडे काही लोक हा थरार घाटता उभे राहून पाहतानाही दिसून येत आहे. तसेच या व्हिडिओत हा थरार पाहताना लोक ओरडण्याचाह आवाज येत आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.