ठाकरेंना आता ABCD पासून सुरुवात करायचीय कारण…; भाजपच्या नेत्याची बोचरी टीका

Girish Mahajan on Uddhav Thackeray Aditya Thackeray : शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची अवस्था सारखीच, त्यांना...; भाजप नेत्याचं ठाकरे गट आणि पवारांवर टीकास्त्र... मराठा आरक्षण, विधिमंडळ अधिवेशन यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. नेमकी काय प्रतिक्रिया दिली? वाचा सविस्तर...

ठाकरेंना आता ABCD पासून सुरुवात करायचीय कारण...; भाजपच्या नेत्याची बोचरी टीका
Follow us
| Updated on: Feb 19, 2024 | 11:43 AM

किशोर पाटील, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, जळगाव | 19 फेब्रुवारी 2024 : ठाकरेंनी आपला पक्ष आणि कुटुंब सांभाळायची जबाबदारी ही ज्याची त्याची आहे. आम्ही तुमचं कुटुंब सांभालाव असं तुम्हाला का वाटत आहे. तुम्ही तुमच्या पक्षांमध्ये जे आता आठ दहा लोक उरले आहेत त्यांना सांभाळा कारण आता रोज बातम्या येत आहेत हा चालला तो चालला. सभा घेणं हे त्यांचं काम.. कारण आता त्यांना पुन्हा ABCD पासून सुरुवात करायची आहे, असं म्हणत भाजपचे वरिष्ठ नेते, मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

ठाकरे पवारांवर टीकास्त्र

उद्धव साहेबांना सुरुवातीपासून प्रयत्न करायचेत आणि शरद पवार साहेबांची ही तीच परिस्थिती आहे. आता त्यांना दिसतयं पक्ष कसे फुटतात. शरद पवार साहेबांनी पण तेच केलं. ते सुद्धा अशाच पद्धतीने बाहेर पडून मुख्यमंत्री झाले होते. ते का हे विसरत आहेत. त्यामुळे दुसऱ्याकडे बोट दाखवताना चार बोटही आपल्याकडे आहे हे सुद्धा त्यांनी विसरता कामा नये, असं गिरीश महाजन म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत केली आहे त्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे आणि शरद पवार दोघांवर निशाणा साधला आहे.

मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया

मराठा आरक्षणावरही मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल आता प्राप्त झाला आहे. त्यासंदर्भातच उद्याचा एक दिवसाचा अधिवेशन बोलवले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातला उद्या ठराव केला जाईल. सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न आमचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच सरकार करत आहे. तात्पुरत्या स्वरूपाचं नाही तर टिकणार आरक्षणा आम्हाला द्यायचा आहे, असं गिरीश महाजन म्हणाले.

उद्या ठराव पारित होईल- महाजन

मागच्या वेळेसच दुर्दैवाने आमचं सरकार नव्हतं. मागच्यावेळी सुप्रीम कोर्टाने ज्या क्युरी काढल्या होत्या त्या सर्व क्युरींची दुरुस्ती आम्ही आता केलेली आहे. या सर्व गोष्टीतूनच मराठा समाजाला आरक्षण आम्हाला द्यायचा आहे आणि उद्या हा ठराव पारित होईल, असा शब्द गिरीश महाजन यांनी दिला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.