Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौतमी पाटीलच्या आडनावाचा वाद; संभाजीराजे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Sambhajiraje Chhatrapati on Gautami Patil Dance : गौतमी पाटीलच्या आडनावाचा वाद; संभाजीराजे यांनी स्पष्ट भूमिका मांडली, म्हणाले...

गौतमी पाटीलच्या आडनावाचा वाद; संभाजीराजे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Follow us
| Updated on: May 29, 2023 | 8:29 AM

जळगाव : नृत्यांगना गौतमी पाटील हिचा डान्स याआधी वादात सापडला होता. आता तिच्या आडनावावरून वाद निर्माण झाला आहे. गौतमी पाटीलने पाटील हे आडनाव वापरू नये अशी भूमिका काही संघटनांनी घेतली आहे. आता संभाजीराजे छत्रपती यांनी गौतमी पाटील हिच्या डान्स आणि आडनावाच्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. महिला संरक्षणाचा मुद्दा संभाजीराजे यांनी उपस्थित केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी महिलांना संरक्षण दिलं. त्यामुळे स्वातंत्र्य सर्वांना आहे. महिलांनाही स्वातंत्र्य आहे. महाराष्ट्र हे वेगळं राज्य आहे. त्यामुळे सर्वांनी गौतमी पाटील यांच्या पाठीमागे उभा राहिलं पाहिजे. कलाकाराला संरक्षण मिळालं पाहिजे, हे या मी मताचा आहे, असं संभाजीराजे म्हणालेत.

बाकीच्या राज्यात जातीवर राजकारण चालतं. जाती विषमता जर कमी करायची असेल बहुजन समाजाच्या लोकांना न्याय दिला गेला पाहिजे. सध्या खालच्या पातळीचे राजकारण सुरू आहे. लोक या अशा राजकारणाला कंटाळले आहेत. खोके-बोके, मांजर-कुत्रे ही भाषा ऐकण्यापेक्षा सुसंस्कृत महाराष्ट्र कसा घडावा, यासाठी लोक अपेक्षा करत आहेत, असंही ते म्हणालेत.

काल देशाच्या नव्या संसदभवनाचं उद्घाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नव्या इमारतीचं उद्घाटन केलं. याला विरोधी पक्षातील नेत्यांनी विरोध केला. राष्ट्रपती देशाच्या प्रथम नागरिक आहेत. त्यांच्या हस्ते उद्घाटन व्हावं, अशी भूमिका विरोधी पक्षांची होती. मात्र काल पंतप्रधानांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं. त्यावरही संभाजीराजे बोलले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनाचं उद्घाटन केलं. मात्र त्यांच्यासोबत राष्ट्रपती असत्या तर या कार्यक्रमाची गरिमा वाढली असती, असं संभाजीराजे म्हणालेत.

ईडीला मी घाबरत नाही का? असं विचारलं असता, ईडीला घाबरायला मी आयुष्यात चुकीचं काम केलंच नाही. त्यामुळे ईडीला घाबरायचं काय कारण? ज्यांना घाबरायचं ते घाबरतील, असं संभाजीराजे म्हणाले आहेत.

सिंदखेड राजा येथील किल्ल्याचा दगड घसरला. त्यावर बोलताना जुनी किल्ले जिवंत ठेवायचे असतील तर वेगळं महामंडळ किंवा वेगवेगळे मार्ग आहेत. मात्र ते होत नाहीत त्यामुळे दुर्दैवी घटना घडतात, असं संभाजीराजे म्हणाले.

शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ.
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी.
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं...
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं....
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न.
ही गुंड प्रवृत्ती..कामराच्या शोच्या सेटची तोडफोड अन् दमानियांचा निशाणा
ही गुंड प्रवृत्ती..कामराच्या शोच्या सेटची तोडफोड अन् दमानियांचा निशाणा.