ते तर पंतप्रधान पदाचे उमेदवार, पण…उद्धव ठाकरेंना गिरीश महाजनांचा खोचक टोला

Girish Mahajan Attack on Uddhav Thackeray : सध्या महाविकास आघाडी महायुतीवर कुरघोडी करण्याच्या तयारीत आहे. दोन्ही गटात धुमश्चक्री उडाली आहे. त्यातच महाराष्ट्र बंदवर उच्च न्यायालयाच्या निकालानंतर राजकारण तापलं आहे. गिरीश महाजन यांनी या सर्व प्रकारावरुन उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे.

ते तर पंतप्रधान पदाचे उमेदवार, पण...उद्धव ठाकरेंना गिरीश महाजनांचा खोचक टोला
गिरीश महाजन यांचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
Follow us
| Updated on: Aug 24, 2024 | 11:12 AM

महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर हायकोर्टाच्या निकालानंतर आता राज्यात वातावरण तापले आहे. महाविकास आघाडी महायुतीवर कुरघोडीच्या तयारीत आहे. दोन्ही गटात शा‍ब्दिक धुमश्चक्री उडाली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी या सर्व प्रकारावरुन उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन चिमटा काढला आहे.

त्यांना तर खुर्चीवर बसण्याची घाई

उद्धव ठाकरे तर पंतप्रधान पदासाठी सुद्धा उमेदवार होते. आता तिकडे पद रिकामे झाल्याने म्हणून मुख्यमंत्री पदासाठी समोर आले. उद्धव ठाकरे यांना तर कोणत्या न कोणता खुर्चीवर बसण्याची घाई झाली आहे. भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांना असा खोचक टोला लगावला आहे.

हे सुद्धा वाचा

महाविकास आघाडीत बिघाडी

तिघांमध्ये, महाविकास आघाडीत तणाव सुरू आहे. कोण मुख्यमंत्री होतं बघूयात. मात्र मुख्यमंत्री होण्यासाठी बहुमत लागेल. पण बहुमत मिळवणे आधीच महाविकास आघाडीमध्ये यांचे भांडण सुरू आहेत, अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदाचा चेहऱ्याबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर दिली आहे.

राज्यात महायुतीचेच सरकार

गल्लो गल्ली आता अनेक कंपनी आहेत की त्या सर्वे करतात. निकाल लागल्यावरच आपल्या समोर सर्व गोष्टी येतील. आता राजस्थान आणि छत्तीसगड येथील विधानसभेच्या मध्यवर्ती निवडणुका झाल्या होत्या त्यावेळी सुद्धा या ठिकाणी भाजप येणार नाही असं सांगण्यात आलं. लटा परिणाम झाला दोन तृतीयांश एवढ्या जागा आमच्या या ठिकाणी निवडून आल्या.सर्वे म्हणजेच सगळं काही असं होत नाही. अनेक वेळेला सर्व हे चुकत असतात. महाराष्ट्रात निश्चितच पुन्हा महायुतीचे सरकारी येईल यात बाबत आमच्या मनात कुठलेही शंका नाही,असे ते म्हणाले.

ठाकरे यांचे विधान काय

महाविकास आघाडीचा निर्धार मेळावा नुकताच मुंबईत झाला. त्यात उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची भूमिका मांडली होती. कुणालाही द्या, पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा. विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा असावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली होती. त्यानंतरच्या बैठकीत सुद्धा त्यांनी हाच मुद्दा लावून धरला होता. त्यावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. तर शरद पवार गटाने या मुद्यावर सावध भूमिका घेतली आहे.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.