“हिम्मत असेल तर उद्धव ठाकरे यांनी सांगावं आम्ही तुमच्याबरोबर राहणार नाही”; भाजपने आघाडीत बिघाडी करण्याचं सूत्र दिलं..

विरोध करायचा आणि पुन्हा त्यांच्याच मांडीवर जाऊन बसायचं असं उद्धव ठाकरे यांच्याकडून अपेक्षित नाही असे स्पष्ट मतही त्यांनी यावेळी मांडले.

हिम्मत असेल तर उद्धव ठाकरे यांनी सांगावं आम्ही तुमच्याबरोबर राहणार नाही; भाजपने आघाडीत बिघाडी करण्याचं सूत्र दिलं..
Follow us
| Updated on: Mar 27, 2023 | 10:26 PM

जळगाव : मालेगावच्या सभेत माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर राहुल गांधी यांना खडे बोल सुनावले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत असल्याचे सांगत त्यांच्यावर टीका केलेली आम्ही खपवून घेणार नाही असं स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितले होते.त्यांच्या याच वक्तव्यावरून आता सत्ताधारी भाजपने उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वावरून डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता भाजपकडून हिंदुत्वाच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे असा सल्ला मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे.

मंत्री गिरीश महाजन यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, हिम्मत असेल तर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला सांगावं की आम्ही तुमच्याबरोबर राहणार नाही अशा शब्दात त्यांनी त्यांना सुनावलं पाहिजे अशा स्पष्ट शब्दात त्यांनी त्यांना सांगितले आहे.

यावेळी गिरीश महाजन यांनी राहुल गांधी यांच्यावरही टीका केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत दुटप्पी भूमिका घेत असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

त्यामुळे उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना तंबी देऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडले पाहिजे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.

विरोध करायचा आणि पुन्हा त्यांच्याच मांडीवर जाऊन बसायचं असं उद्धव ठाकरे यांच्याकडून अपेक्षित नाही असे स्पष्ट मतही त्यांनी यावेळी मांडले.गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वावरून त्यांनी हिंदुत्वाची तत्व कशी गुंडाळून ठेवली असल्याचे म्हणत त्यांनी त्यांना टोला लगावला आहे.

मंत्री गिरीश महाजन यांनी एकाच वेळी उद्धव ठाकरे, राहुल गांधी, काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या राजकारणावर जोरदार हल्लाबोल केला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.