‘संजय राऊतांसाठी राम या शब्दाचा उलटा शब्द वापरायला पाहिजे’, गुलाबराव पाटील यांची खोचक टीका

मंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केलीय. गुलाबराव पाटील यांच्या या टीकेला ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

'संजय राऊतांसाठी राम या शब्दाचा उलटा शब्द वापरायला पाहिजे', गुलाबराव पाटील यांची खोचक टीका
Follow us
| Updated on: Jan 15, 2024 | 7:23 PM

किशोर पाटील, Tv9 मराठी, जळगाव | 15 जानेवारी 2024 : शिवसेना नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर अतिशय खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी अयोध्येतील राम मंदिरावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. “देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला शिकवू नये”, असं संजय राऊत म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर गुलाबराव पाटील यांनी राऊतांवर घणाघात केला. “संजय राऊतांसाठी राम या शब्दाचा उलटा शब्द वापरायला हवा”, अशा कडक शब्दांत गुलाबराव पाटील यांनी निशाणा साधला. त्यांच्या या वक्तव्याची आज राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा देखील होऊ लागली आहे.

भाजप नेते आशिष देशमुख म्हणत आहेत तशीच परिस्थिती या देशामध्ये आहे. या देशात भगवा झेंडा घेऊन चालेल त्यांचेच राज्य येणार आहे. जो भगवा हित की बात करेगा वही देश पे राज करेंगा, असं गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले. “काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची रांग लागेल”, असं वक्तव्य आशिष देशमुख यांनी केलं आहे. या वक्तव्यावरही मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे

‘गिरीश भाऊंचे अंदाज बऱ्यापैकी चुकत नाही’

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभेची एक तरी जागा निवडून आणून दाखवावी, असं चॅलेंज भाजपचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे. याच विषयावरून मंत्री गुलाबराव पाटील यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “गिरीश भाऊंचे अंदाज बऱ्यापैकी चुकत नाही. त्यामुळे गिरीश महाजन यांचा राजकीय अंदाज खरा ठरो. माझ्या हाताने ते पेढा खावोत”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

‘कोर्ट योग्य निर्णय घेईल’

आमदार पात्रता प्रकरणात उद्धव ठाकरे गटाच्या वतीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर लवकरच सुनावणी होणार आहे. याबाबत गुलाबराव पाटील यांना प्रश्न विचारला असता, “निकाल कोर्टाचा आहे त्यामुळे कोर्टाच्या निर्णयावर बोललो तर उचित होणार नाही. कोर्ट योग्य तो न्याय घेईल”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.