“लोकं संजय राऊत यांच्याकडे करमणूक, जोकर म्हणून बघतात”; फडणवीसांच्या टीकेनंतर भाजप नेत्याने ठाकरे गटाला सुनावलं…

महाविकास आघाडीचे सरकार असताना तुम्ही कुणाकुणाच्या मांडीला मांडी लावून बसला होता असा प्रतिसवाल करत गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांना सुनावलं आहे.

लोकं संजय राऊत यांच्याकडे करमणूक, जोकर म्हणून बघतात; फडणवीसांच्या टीकेनंतर भाजप नेत्याने ठाकरे गटाला सुनावलं...
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 4:54 PM

जळगाव : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांच्या टीकेमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हणाले होते की, भ्रष्टाचाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याची टीका केली होती. त्यावरूनच आता भाजप नेत्यांनीही ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आज जळगाव दौऱ्यावर असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्याने त्यांच्यावर जहरी टीका करण्यात आली आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेवर आणि भाजपवर टीका करताना गद्दार आमदार आणि खासदार म्हणत बंडखोर आमदारांवर त्यांनी निशाणा साधला होता.

तर उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर संजय राऊत यांनीही त्यांच्यावर शिवेसना आणि भाजपच्या युतीवरून टीका केली होती. त्यामुळे भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी आता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना गिरीश महाजन म्हणाले की, आता संजय राऊत बोलायला लागले की, लोकं संजय राऊत यांच्याकडे करमणूक आणि जोकर म्हणून बघतात या शब्दात त्यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.

गिरीश महाजन यांनी ठाकरे गटावर टीका करताना त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरूनही त्यांना छेडण्यात आले आहे. आज भाजपच्या युतीवर टीका करताना भ्रष्टाचारा मुद्दा तु्म्ही उपस्थित करता.

मात्र महाविकास आघाडीचे सरकार असताना तुम्ही कुणाकुणाच्या मांडीला मांडी लावून बसला होता असा प्रतिसवाल करत गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांना सुनावलं आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना खासदार संजय राऊत यांनी फडणवीस हे भ्रष्टाचाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याची टीका केली होती. या टीकेनंतर वातावरण ढवळून निघाले आहे.

संजय राऊत यांना आता कोणत्याही प्रकारचा ताल राहिलेला नाही, ते दररोज सकाळी उठून काहीही बरळत असतात अशा शब्दात त्यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.

गिरीश महाजन म्हणाले की, स्वतः काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून हे बसले आहेत, त्याच बरोबर राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन हेच बसले आहेत. ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत, ते नवाब मलिक, अनिल देशमुख कुठे आहेत असा सवाल करत म्हणाले की, अजून कितीतरी लोकांची मी नावे घेईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

त्यामुळे संजय राऊत यांनी आता थोडासा विचार करून बोलत जाण्याचा सल्ला मी देईन असा टोला त्यांनी त्यांना लगावला आहे. संजय राऊत रोज काही ना काही बरळत असतात त्यामुळे संजय राऊत आणि विचार याचा काही संबंधच राहिलेला नाही अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.