AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उत्तर महाराष्ट्रातील बड्या रुग्णालयांना महावितरणचा दणका; थकबाकी न भरणाऱ्या हॉस्पिटलवर होणार कारवाई

कोविड-19 आपत्तीमुळे महावितरण कंपनीची आर्थिक स्थिती बिकट असून, थकबाकी वसूल करण्याखेरीज दुसरा पर्याय उरलेला नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात थकबाकी ठेवणे शक्य नसल्याने आपल्या स्तरावर योग्य तो पाठपुरावा करून थकबाकी भरण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन महावितरणने केले होते. मात्र, रुग्णालयांनी याकडे दुर्लक्ष केल्याने आता कारवाई करण्यात येणार आहे.

उत्तर महाराष्ट्रातील बड्या रुग्णालयांना महावितरणचा दणका; थकबाकी न भरणाऱ्या हॉस्पिटलवर होणार कारवाई
electricity bill
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 11:18 AM

नाशिकः खान्देशातील विविध कोविड (Covid) रुग्णालयांकडे 8 कोटी 37 लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. महावितरणने (MSEDCL) वारंवार पाठपुरावा करूनही या रुग्णालयांनी थकबाकी भरलेली नाही. त्यामुळे आता नाईलाजास्तव या रुग्णालयांवर कारवाई करण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे महावितरणने म्हटले आहे. कोविडच्या संकटातही महावितरणने नागरिकांसह सर्व रुग्णालये व अत्यावश्यक सेवांना अखंडित वीजपुरवठा केला. यात कोरोना (Corona) रुग्णांवर उपचार करणाऱ्या शासकीय व खासगी रुग्णालयांचाही समावेश आहे. तेथे वीजपुरवठा खंडित होणार नाही याची महावितरणने पूर्णपणे काळजी घेतली. त्यामुळे वीजपुरवठा खंडित न करता थकबाकी भरण्यासाठी संबंधित रुग्णालयांच्या प्रशासनाकडे महावितरण वारंवार पाठपुरावा करत आहे. मात्र, रुग्णालयांनी बिलांची थकबाकी भरलेली नाही. त्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलावे लागत असल्याचे कळवण्यात आले आहे.

कोट्यवधींची थकबाकी

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील दोन वीज जोडण्यांची 1 कोटी 84 लाख 64 हजार 244 रुपये थकबाकी आहे. तर जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे 10 लाख 69 हजार 113 रुपयांचे वीजबिल थकीत आहे. तर गोदावरी फाउंडेशनच्या डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाकडे तब्बल 5 कोटी 22 लाख 79 हजार 634 रुपयांचे वीजबिल थकीत आहे. धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाकडे 53 लाख 29 हजार 989 रुपये तर शिरपूर येथील शासकीय रुग्णालयाकडे 15 लाख 49 हजार 795 रुपये वीजबिल थकले आहे.

वारंवाट नोटीस बजावली

नंदुरबार येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे 51 लाख 3 हजार 142 रुपये वीजबिल थकीत आहे. याबाबत दोन महिन्यांपूर्वी महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी या रुग्णालयांच्या अधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षकांना पत्र लिहून वीजबिलाची पूर्ण थकबाकी भरण्याचे आवाहन केले होते. थकबाकी भरण्यासंदर्भात वेळोवेळी नोटिसा बजावण्यात आल्या. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही संबंधितांकडून कोणताही योग्य प्रतिसाद प्राप्त झालेला नाही.

आता थेट वसुली

कोविड-19 आपत्तीमुळे महावितरण कंपनीची आर्थिक स्थिती बिकट असून, थकबाकी वसूल करण्याखेरीज दुसरा पर्याय उरलेला नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात थकबाकी ठेवणे शक्य नसल्याने आपल्या स्तरावर योग्य तो पाठपुरावा करून थकबाकी भरण्याची व्यवस्था करावी. अन्यथा कंपनी नियमाप्रमाणे कार्यवाही करण्याचा इशारा देण्यात आला होता. या पत्रांच्या प्रती जळगाव, धुळे व नंदुरबारचे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सकांनाही पाठवण्यात आल्या होत्या. तथापि, महावितरणच्या आवाहनाला संबंधितांनी प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे थकबाकीपोटी या रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

इतर बातम्याः

Nashik | उद्योजकाच्या घरावर दरोडा; बाळाच्या मानेवर सुरा ठेवून 50 तोळे सोने लुटले, महिलांचे तोंड चिकटपट्टीने बंद!

नाशिक – दिंडोरी सिटी बस सुरू; गामीण भागात वाढवला विस्तार, मार्ग काय राहणार?

नाशिककरांना दिलासा; 4 वर्षांपूर्वी केलेली अव्वाच्या सव्वा करवाढ निवडणुकीच्या तोंडावर मागे!

पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस.
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.