MSEDCL : वीजचोरी रोखण्यासाठी महावितरणची धडक मोहीम; खान्देशात 3 हजारांहून अधिक आकडे काढले

वीजचोरी करणाऱ्या आकडेबहाद्दरांवर कारवाई करण्यासाठी महावितरण नाशिकसह जळगाव परिमंडलाने 21 एप्रिलपासून धडक मोहीम हाती घेतली असून, हजारो आकडे काढून केबल जप्त केल्या आहेत. या प्रयत्नांमुळे यंत्रणेवरील ताण कमी होऊन् आर्थिक भार हलका होण्यास मदत होणार आहे.

MSEDCL : वीजचोरी रोखण्यासाठी महावितरणची धडक मोहीम; खान्देशात 3 हजारांहून अधिक आकडे काढले
महावितरणने वीजचोरी रोखण्यासाठी धडक कारवाई सुरू केली आहे.
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 11:31 AM

नाशिक : वाढत्या विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी व भारनियमन टाळण्यासाठी महावितरणवर (MSEDCL) खुल्या बाजारातून महागडी वीज (power) घेण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे अनेक आकडे बहाद्दर बिनदिक्कतपणे विजेची चोरी (power theft) करतात. त्यांच्या वाढीव भारामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाणही वाढत आहे. या आकडेबहाद्दरांवर कारवाईसाठी महावितरण नाशिकसह जळगाव परिमंडलाने 21 एप्रिलपासून धडक मोहीम हाती घेतली असून, हजारो आकडे काढून केबल जप्त केल्या आहेत. या प्रयत्नांमुळे यंत्रणेवरील ताण कमी होऊन् आर्थिक भार हलका होण्यास मदत होणार आहे. तापमानात जशी वाढ होईल तशी राज्याची विजेची मागणी वाढत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मार्च महिन्यापासून महावितरणची मागणी 24500 मेगावॅटच्या पुढे गेली आहे. तसेच ही मागणी टिकून आहे. उलट यात वाढच होत आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही महाराष्ट्र शासन व महावितरण कसोशीने प्रयत्न करत आहे. मात्र, ही परिस्थिती सबंध देशात असल्याने वीज मिळणेही अवघड झाले आहे.

कृषिपंप, केबल, स्टार्टर जप्त

खुल्या बाजारात विजेचे दर 12 रुपयांपर्यंत आहेत. ही महागडी वीज घ्यायची तर त्याचा बोजा पुन्हा ग्राहकांवर येणार. ती कमीत कमी घेता यावी याकरिता यंत्रणेवरील अनधिकृत भार कमी करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत. आकडे बहाद्दरांवर कारवाई करताना ज्या 11 केव्ही वीज वाहिन्यांचा करंट 100 ॲम्पीअरच्या पुढे आहे, अशा वाहिन्यांवर गुरुवारी सकाळपासूनच धडक मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये अनधिकृतपणे जोडलेले कृषिपंप, त्याचे केबल, स्टार्टर आदी जप्त केले जात आहेत.

वीज भार झाला कमी

घरगुती व इतर ग्राहकांचे आकडेही काढले जात आहेत. या कामात वरिष्ठ अभियंत्यापासून तंत्रज्ञ, यंत्रचालक, कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. या मोहिमेत 21 ते 24 एप्रिलपर्यंत जळगाव परिमंडलात दोनशेहून अधिक वीज वाहिन्यांवर आकडे काढण्याची व वीजचोरी पकडण्याची मोहीम राबवण्यात आली. यामध्ये जळगाव जिल्ह्यात 1457, धुळे जिल्ह्यात 947 तर नंदुरबार जिल्ह्यात 776 आकडे काढण्यात आले. तर 59 प्रकरणात वीजचोरीची कारवाई करण्यात आली. या अनधिकृत वीजवापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याने वीज वाहिन्यांवरील भारही कमी झाला. त्यामुळे जळगाव परिमंडलात या वाहिन्यांवर 21 एप्रिल रोजी 77.22 एमडब्ल्यू, 22 एप्रिल रोजी 62.05 एमडब्ल्यू, 23 एप्रिल रोजी 37.12 एमडब्ल्यू तर 24 एप्रिल रोजी 17.31 एमडब्ल्यू भार कमी झाला.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.