‘मला एकाकी पाडण्याचा प्रयत्न, मी सरकारच्या विरोधात सुद्धा लढेल’, शिंदेंचे समर्थक आमदार चंद्रकांत पाटील संतापले

"काही लोकांच्या फायद्यासाठी सरकार स्वतःची बदनामी करून घेत असेल, सरकारच्या 137 कोटी रुपयांचे नुकसान सरकारच्याच माध्यमातून होत असेल तर हे बेकायदेशीर आहे. सरकारच्या माध्यमातून तर मला एकाकी पाडण्याचा प्रयत्न होत असेल तर मी सरकारच्या विरोधात सुद्धा लढेल", असं वक्तव्य मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

'मला एकाकी पाडण्याचा प्रयत्न, मी सरकारच्या विरोधात सुद्धा लढेल', शिंदेंचे समर्थक आमदार चंद्रकांत पाटील संतापले
चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे
Follow us
| Updated on: Sep 20, 2024 | 6:10 PM

किशोर पाटील, Tv9 प्रतिनिधी, जळगाव : आमदार एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांना मुक्ताईनगर तालुक्यातील गौण खनिज घोटाळ्यात 137 कोटी रुपयांच्या कारवाईला स्थगिती मिळाल्याने, तसेच खडसे कुटुंबीयांवर बसविण्यात आलेले बोझे नियमबाह्य पद्धतीने उतरवण्यात आले, असा आरोप मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. “ज्यांच्याविरुद्ध तक्रार होती त्या खडसे कुटुंबीयांवर दंडाच्या अनुषंगाने बोझे बसविण्यात आले होते मात्र नियमबाह्य पद्धतीने ते बोझे उतरवण्यात आले”, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. “एखाद्या राजकीय पक्षाच्या दबावातून अधिकारी काम करत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे”,अशी माझी मागणी आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“काही लोकांच्या फायद्यासाठी सरकार स्वतःची बदनामी करून घेत असेल, सरकारच्या 137 कोटी रुपयांचे नुकसान सरकारच्याच माध्यमातून होत असेल तर हे बेकायदेशीर आहे. सरकारच्या माध्यमातून तर मला एकाकी पाडण्याचा प्रयत्न होत असेल तर मी सरकारच्या विरोधात सुद्धा लढेल. मी कोणत्याही सरकारला घाबरणारा माणूस नाही. निवडणूक मतदारांच्या जीवावर लढलो होतो. उद्याचं काय होईल याची चिंता मी करत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात गौण खनिजांमध्ये भ्रष्टाचार करायचा आणि त्याला पाठीशी सरकारने घालायचं, हा मुद्दा मला आवडत नाही. माझ्यासाठी न्यायालयाचे सर्व दार उघडे आहेत. मी न्यायालयाच्या माध्यमातून न्याय मागण्याचा प्रयत्न करेन”, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली.

नेमकं प्रकरण काय?

एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध गौण खनिज घोटाळ्याची तक्रार आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. या प्रकरणात 137 कोटी रुपयांचा दंड खडसे कुटुंबीयांना सुनावण्यात आला आहे. या कारवाईला मिळालेली स्थगिती तसेच याच प्रकरणात खडसे कुटुंबीयांच्या उताऱ्यावर लावण्यात आलेले बोझे हे बेकायदेशीर नियमबाह्य पद्धतीने उतरवण्यात आल्याचा गंभीर आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. हा नियमबाह्य प्रकार उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देईन. संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी सुद्धा मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.