गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात जावून शरद पवार संतापले, कापसाच्या भावावरुन घेरलं, ‘त्या’ अपघातावरुन निशाणा

शरद पवार यांची आज जामनेरमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत शरद पवार यांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला. विशेष म्हणजे खान्देशातील शेतकऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या कापसाच्या दरावर शरद पवारांनी भूमिका मांडली.

गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात जावून शरद पवार संतापले, कापसाच्या भावावरुन घेरलं, 'त्या' अपघातावरुन निशाणा
गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात जावून शरद पवार संतापले
Follow us
| Updated on: Nov 11, 2024 | 7:55 PM

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची आज जामनेरमध्ये सभा पार पडली. या सभेत शरद पवार यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सडकून टीका केली. “लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चित्र वेगळं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींची सत्ता आली. पण 400 खासदार निवडून यावे असा त्यांचा मानस होता. कारण यांच्या मनामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना बदलण्याचा पाप होतं. राज्यघटनेमध्ये हस्तक्षेप करण्याचा मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा डाव होता. लोकांची शक्ती घेतली आणि संविधानावर हल्ला करण्याचं सूत्र या मोदी सरकारचं होतं. पाच वर्षांमध्ये माझे केवळ पाच खासदार होते. या वेळेस तुम्ही माझे खासदार निवडून दिले. यावेळी 48 पैकी 31 जागा तुम्ही निवडून दिल्या. त्यामुळे घटनादुरुस्ती करण्याचे पाप मोदींना करता आलं नाही”, असा घणाघात शरद पवार यांनी केला.

“सरकारला यांच्या हातात सत्ता आली. मात्र त्यांनी सत्तेचा उपयोग आपल्यासाठी केला नाही. सत्तेचा दुरोपयोग केला. जळगावच्या एका घटनेत अपघातात मृत्यू झाला. रामदेव वाडी अपघात. श्रीमंत तरुणांनी गाडी जोरात चालवली. या घटनेत बंजारा समाजाच्या चार जणांचा मृत्यू झाला. हे कोण्याचे पोर होते? या प्रकरणात कारवाई झाली नाही आणि ही कुणामुळे झाली नाही हे सांगण्याचे मला गरज नाही”, असं म्हणत शरद पवार यांनी रामदेव वाडी अपघाताच्या प्रकरणावरुन मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला.

शरद पवार खान्देशातील ज्वलंत विषयावर बोलले, कापसाच्या भावावरुन महाजनांना सुनावलं

“टेक्स्टाईल पार्क चार वर्षात झाला नाही. कापसाला भाव मिळाला नाही. सरकार तुमच्या हातात असताना टेक्स्टाईल पार्क करू, अशी घोषणा तुम्ही केली. मात्र तो केला नाही. गेल्या काही वर्षांपूर्वी 7000 रुपये भाव द्यावा म्हणून आंदोलन केले. मात्र आता किती भाव? कापसाच्या भावासाठी आंदोलन करणारे तुमच्या तालुक्याचे मंत्री आता एक शब्द सुद्धा बोलत नाहीत. महाविकास आघाडीचे सरकार असताना कापसाला 10 हजार रुपये किमान भाव होता. मात्र आता भाव खाली पडले आहे”, असं म्हणत शरद पवारांनी खान्देशातील मुख्य विषयाला वाचा फोडला.

हे सुद्धा वाचा

“खान्देशात कापूस पिकत असताना या लोकांनी बाहेर परदेशातून कापूस आणण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना फसवण्याचं काम सरकारमधल्या या ठिकाणच्या नेत्यांनी केलं आहे. कार्यकर्ता काम घेऊन गेला तर त्याला दम देण्याचं काम तुम्ही करतात. स्वतःचा वापर तुम्ही अशा पद्धतीने करतात?”, अशा शब्दांत शरद पवारांनी सुनावलं. तसेच “तुमच्यासोबत असं घडत असेल तर त्यांना एकच सांगा. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी”, असं शरद पवार यांनी नागरिकांना आवाहन केलं.

‘त्यांना लोक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही’

“जामनेरमध्ये अजून एक सुद्धा प्रकल्प पूर्ण झालेला नाही. त्यांच्यासाठी जी जमीन घेतली होती त्याची किंमत सुद्धा मिळालेली नाही. असे लोक तुम्हाला सांगत आहेत की सत्ता द्या. पुढचे 5 वर्ष आमच्या हातात सत्ता द्या. त्यांना लोक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”, असा इशारा शरद पवारांनी दिला.

“या ठिकाणी एक साधा शिक्षक त्याला आम्ही या ठिकाणी संधी दिलेली आहे. लोकसभेत आम्ही निलेश लंके याला संधी दिली. त्याच्या घरी मी गेलो तर दहा बाय दहाचं घर होतं. लंके हा साधा माणूस. त्याला लोकांनी डोक्यावर घेतले. आज देशाच्या लोकसभेत गेला आणि आमच्या शेजारी बसतो. तसेच जामनेरमध्ये दुसरा निलेश लंके म्हणजे शिक्षक दिलीप खोडपे यांना मोठ्या मतांनी विजयी करा. या तुमच्या निलेश लंकेला विधानसभेत पाठवा. जामनेरच्या जनतेला हा इतिहास या ठिकाणी घडवावा लागेल”, असं शरद पवार म्हणाले.

Non Stop LIVE Update
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.