Eknath Khadse : जळगाव सहकारी दूध संघाच्या मुख्य प्रशासकपदी मंगेश चव्हाण, एकनाथ खडसेंना धक्का, प्रशासक मंडळाने स्वीकारला पदभार

आज नियुक्त प्रशासक मंडळांतील सदस्यांनी जिल्हा दूध संघाचा पदभार घेतल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नियुक्त प्रशासक मंडळ व खडसे यांच्यातील वाद टोकाला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Eknath Khadse : जळगाव सहकारी दूध संघाच्या मुख्य प्रशासकपदी मंगेश चव्हाण, एकनाथ खडसेंना धक्का, प्रशासक मंडळाने स्वीकारला पदभार
जळगाव सहकारी दूध संघाच्या मुख्य प्रशासकपदी मंगेश चव्हाण
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 3:57 PM

जळगाव : जिल्हा दूध संघावर ( Co-operative Societies) नियुक्त केलेल्या प्रशासन मंडळाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. असे असतानाच दुसरीकडे गिरीश महाजन समर्थक मुख्य प्रशासक म्हणून भाजप आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavhan) तसेच इतर प्रशासकीय मंडळातील सदस्यांनी (Board of Directors) आज दूध संघाचा ताबा घेत खडसेंना आव्हान दिले आहे. शासनाने नियुक्त केलेले हे प्रशासक मंडळ नियमबाह्य असल्याचे सांगत या विरोधात एकनाथ खडसेंनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. याबाबत खडसेंनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

प्रशासक मंडळ, खडसे यांच्यातील वाद

असे असतानाच आज नियुक्त प्रशासक मंडळांतील सदस्यांनी जिल्हा दूध संघाचा पदभार घेतल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नियुक्त प्रशासक मंडळ व खडसे यांच्यातील वाद टोकाला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मी शेतकरी हिताचे निर्णय घेणार असल्याचे यावेळेस आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले. खडसे यांनी थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्यामुळं आता कोर्टातच यासंदर्भात योग्य तो निर्णय होईल. तोपर्यंत मंगेश चव्हाण हे प्रशासन सांभाळणार आहेत. दूध संघ हातात असणे फार महत्त्वाचे असते. एकनाथ खडसे यांच्यासाठी यामुळंच हा धक्का मानला जात आहे.

हे सुद्धा वाचा

न्यायालय योग्य निर्णय घेईल

कोणाला प्रशासकीय मंडळ बेकायदेशीर वाटत असेल त्यांनी न्यायालयात दाद मागितली आहे. सहकार क्षेत्रातील काही तरतुदी मी वाचलेल्या आहेत. कोणी कायद्याचा अभ्यास जास्त केला असेल. पण मी माझ्या माहितीनुसार एक वर्षाच्या वरती संचालक मंडळ असणे याबाबत कायद्यात कुठलीही तरतूद नाही. या संचालक मंडळाला सात वर्षे पूर्ण झाले आहेत. शासनाने त्यांचा अधिकार सहा वर्षाच्या वर कुठलीही बॉडी काम करू शकत नाही. ज्याला काही वाटत असेल त्याने न्यायालयात दाद मागितली असेल. न्यायालय योग्य निर्णय घेईल असे जळगावच्या दूध संघाचे मुख्य प्रशासक मंगेश चव्हाण यांनी सांगितलं.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.