स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार, इतरांचा खर्च किती?

जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर आले आहे.

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार, इतरांचा खर्च किती?
स्मिता वाघ
Follow us
| Updated on: Jul 06, 2024 | 5:00 PM

जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक ‘खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर आली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण 14 आणि रावेरमध्ये 24 उमेदवार रिंगणात होते. जळगाव रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघातील सर्वच उमेदवारांच्या खर्चावर केंद्रीय निरीक्षकांनी गुरुवारी शिक्कामोर्तब केले. यात स्मिता वाघ यांचा सर्वाधिक खर्च झाला असून त्यापाठोपाठ रावेरमधील महायुतीचे उमेदवार श्रीराम पाटील आणि भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांचा खर्च झाल्याचे स्पष्ट झालं आहे. जळगाव लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार स्मिता उमेदवार यांचा 77 लाख 42 हजार 964 एवढा खर्च झाला आहे.

रावेर लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा 64 लाख 20 हजार 130 रुपये एवढा खर्च झाला आहे. रावेर लोकसभेतील महायुतीचे उमेदवार रक्षा खडसे यांचा 61 लाख 10 हजार 648  रुपये एवढा खर्च झाला आहे. जळगाव लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांचा 55 लाख 98 हजार 741 रुपये एवढा खर्च झाला आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघात एका उमेदवाराने केवळ 200 रुपये तर रावेरमधील एकाने 1100 रुपये खर्च करीत लोकसभा निवडणुक लढविल्याचे दिसून आले. जळगाव लोकसभेचे निवडणुकीचे निरीक्षक कुमार चंदन आणि रावेर लोकसभेचे निवडणुकीचे निरीक्षक संदिपाल खान यांनी तीन टप्प्यात हिशेबाची पडताळणी केली. खर्चासह अन्य देयके सादर करण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार 4 जुलैला ही मुदत संपल्यानंतर निरीक्षकांनी खर्चाचे विवरणावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर आली आहे.

स्मिता वाघ या ठरल्या जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार

जळगाव रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघातील सर्वच उमेदवारांच्या खर्चावर केंद्रीय निरीक्षकांनी गुरुवारी शिक्कामोर्तब केले आहे. त्यानुसार स्मिता वाघ यांचा सर्वाधिक खर्च झाला असून त्यापाठोपाठ रावेरमधील श्रीराम पाटील आणि रक्षा खडसे यांचा खर्च झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जळगावमधील एका उमेदवाराने 25 हजारांची अनामत रक्कम वगळता केवळ 200 तर रावेरमधील एकाने 1100 रुपये खर्च करीत लोकसभा निवडणुक लढविल्याचे दिसून आले आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघात 14 आणि रावेरमध्ये 24 उमेदवार रिंगणात होते. या उमेदवारांचा खर्चाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आयोगाने कुमार चंदन यांची जळगाव मतदारसंघासाठी तर रावेरसाठी संदीपान खान यांची नियुक्ती केली होती. या दोन्ही निरीक्षकांकरवी तीन टप्प्यात हिशेबाची पडताळणी करण्यात आली.१० मे ला तिसरा टप्पा पूर्ण झाला असताना निकालानंतरचा झालेल्या खर्चासह अन्य देयके सादर करण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार ४ जुलैला ही मुदत संपल्यानंतर निरीक्षकांनी खर्चाचे विवरणावर शिक्कामोर्तब केले आणि गुरुवारी दुपारी ते रवाना झाले.

Non Stop LIVE Update
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर.
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय.
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन.
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा.
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी.
मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस; शाळांना सुट्टी, शिक्षणमंत्री काय म्हणाले
मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस; शाळांना सुट्टी, शिक्षणमंत्री काय म्हणाले.
मुंबईच्या या दुरावस्थेला प्रशासनच जबाबादार - वडेट्टीवार संतापले
मुंबईच्या या दुरावस्थेला प्रशासनच जबाबादार - वडेट्टीवार संतापले.
मुसळधार पावसाचा फटका, मुंबई मनपा कंट्रोल रुम रात्रीपासून सज्ज
मुसळधार पावसाचा फटका, मुंबई मनपा कंट्रोल रुम रात्रीपासून सज्ज.
दाणादाण करत पावसाचं कमबॅक, लोकल ठप्प; चाकरमान्यांचा प्रचंड त्रागा
दाणादाण करत पावसाचं कमबॅक, लोकल ठप्प; चाकरमान्यांचा प्रचंड त्रागा.
Mumbai Rains Update : मुंबईतील मुसळधार पावसाचा आमदारांनाही फटका
Mumbai Rains Update : मुंबईतील मुसळधार पावसाचा आमदारांनाही फटका.