सुवर्णनगरीत सोन्याची मुसंडी, चांदी पण चमकली
Gold-Silver Rate Today | जळगावच्या सराफा बाजारात ग्राहकांचा आज मोठा हिरमोड झाला. बाजारात सोने-चांदीच्या किंमतीत मोठी उसळी आली. सोन्यापाठोपाठ चांदीने पण जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे ग्राहकांच्याच नाही तर गुंतवणूकदारांच्या तोंडचे पाणी पळाले. दिवाळीनंतर पहिल्यांदा दोन्ही धातूंनी लांब पल्ला गाठला.
किशोर पाटील, जळगाव | 17 नोव्हेंबर 2023 : जळगावमधील सुवर्णपेठेने आज ग्राहकांची घोर निराशा केली. सोने-चांदीचे भाव गगनाला भिडले. सोने-चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली. सोन्यानंतर चांदीत पण मोठी वाढ झाली. गेल्या वर्षापेक्षा यंदाच्या दिवाळीत सोने खरेदीत 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अनेकांनी जोरदार खरेदी केली. धनत्रयोदशीला आणि दिवाळी पाडव्याला सोने-चांदीच्या किंमतीत वाढ झाली होती. या दरवाढीने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांच्या उत्साहावर यामुळे पाणी फेरले.
दिवाळीत मोठी उलाढाल
देशातील सोने खरेदीच्या एकूण उलाढालीत सुवर्णनगरीचा मोठा वाटा आहे. यंदा सुवर्णनगरीमध्ये खरेदीदारांनी लयलूट केली. मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची खरेदी झाली. गेल्या तीन वर्षांचा विचार केला तर सोने खरेदीमध्ये 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली. दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये सुवर्णनगरीत 200 कोटींपेक्षा जास्त उलाढाल झाली दिसून आली.
आज अशी घेतली उसळी
आज जळगावच्या सराफा पेठेत सोन्याच्या भावात 700 रुपयांनी तर चांदीच्या दरात किलोमागे 2 हजारांची वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरची किमत वाढल्याने सोने चांदीच्या दरवाढीवर मोठा परिणाम झाल्याने ही दरवाढ दिसून आली. या दरवाढीमुळे ग्राहकांनी दागिने खरेदीकडे पाठ फिरवली. दिवाळीत ग्राहकांनी बाजारपेठ गजबजली होती. सोने-चांदीच्या दरात वाढ झाल्यामुळे दिवाळीनंतर ग्राहकांची संख्या घटली आहे.
दिवाळीत 200 कोटींची उलाढाल
यंदा दिवाळीत सोने खरेदीसाठी ग्राहकांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. दिवाळीतील पाच दिवसांत सुवर्णनगरीत 200 कोटींपेक्षा जास्त उलाढाल झाली होती. गेल्या तीन वर्षांचा विचार केला तर सोने खरेदीमध्ये 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली होती. आज मात्र ग्राहकांचा हिरमोड झाला.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.