जळगावमध्ये धावत्या रुग्णवाहिकेला अचानक आग, ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, प्रचंड खळबळ
जळगावमध्ये धावत्या रुग्णवाहिकेला अचानक आग लागून रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावर गुजरात पेट्रोल पंपाजवळ ही भीषण घटना घडली आहे.
किशोर पाटील, Tv9 प्रतिनिधी, जळगाव : जळगावमध्ये धावत्या रुग्णवाहिकेला अचानक आग लागून रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावर गुजरात पेट्रोल पंपाजवळ ही भीषण घटना घडली आहे. या स्फोटामध्ये रुग्णवाहिका पूर्णपणे जळून खाक झाली आहे.. स्फोटाच्या आवाजाने आजूबाजूला असलेली एटीएम तसेच काही घरांच्या काचा फुटल्या, इतका भीषण तो स्फोट होता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शंनी दिली आहे. या दुर्घटनेत रुग्णवाहिकेचा चालक सुदैवाने बचावला आहेय
रुग्णवाहिकेला आग लागल्यानंतर चालकाच्या प्रकार लक्षात आल्यानंतर तो खाली उतरला. त्यामुळे त्याला कुठलीही दुखापत झालेली नाही. रुग्णवाहिकेला अचानक आग लागली. ती आग सर्वत्र पसरली आणि त्यामुळे रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे..
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दल घटनास्थाळाकडे रवाना झालं. अग्निशामक दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असल्याची माहिती मिलत आहे. दरम्यान, घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे काही काळ महामार्गावरील वाहतूकदेखील ठप्प झाली होती.