Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजय-अतुल आता खान्देशातल्या ‘जयेश खरे’ला संधी देणार का? हा चिमुकला किती गोड गातो, पाहा VIDEO

जगदीश संधानशिव हा खान्देशातला लोकप्रिय गायक. त्याने अनेक अहिराणी गाणी गायली आहेत. त्याचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे. त्यावर त्याची सर्व गाणी आहेत. या गायकाने खान्देशातील एका चिमुकल्या गायकाला समोर आणलं आहे, ज्याचा आवाज खूप गोड आहे. या चिमुकल्याच्या आवाजातील गाणं सोशल मीडियावर लोकप्रिय ठरताना दिसत आहे.

अजय-अतुल आता खान्देशातल्या 'जयेश खरे'ला संधी देणार का? हा चिमुकला किती गोड गातो, पाहा VIDEO
Follow us
| Updated on: Jul 13, 2023 | 10:13 PM

जळगाव : महाराष्ट्रात गायन आणि संगीत इंडस्ट्रीतलं सर्वात मोठं नाव असलेले गायक अजय-अतुल हे त्यांच्या संवेदनशील स्वभावामुळे देखील लोकप्रिय आहेत. त्यांचा आवाज इतका सुंदर आहे की त्या आवाजापुढे जीव ओवाळून टाकावा, असं वाटतं. विशेष म्हणजे इतकी मोठी कला असताना त्यांचे पाय जमिनीवर आहेत. त्यांना प्रचंड माणुसकी आहे. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्येही या मराठी बांधवांचा डंका आहे. राज्यात काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेला ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट प्रदर्शित झाल. या चित्रपटात अजय-अतुल यांचं संगीत आणि पहाडी आवाज बघायला मिळाला.

विशेष म्हणजे अजय-अतुल यांनी या चित्रपटाच्या एका गाण्यासाठी एका चिमुकल्या गायकाला संधी दिली. जयेश खरे असं या गायकाचं नाव. या जयेशने ‘गाऊ नको कृष्णा’ हे गाणं गायलं. जयेशने हे गाणं खूप सुंदर गायलं आहे. त्यामुळे राज्यभरात त्याचं कौतुक होत आहे. जयेश खरे हा छोटा गायक सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धीस आला. त्याने चंद्रा चित्रपटातील गाणं गायलं होतं. त्याच्या शाळेतील वर्गशिक्षकांनी हे गाणं मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केलं आणि सोशल मीडियावर शेअर केलं होतं. जयेश खरे याचा आवज खरंच मनाला भावणारा आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी या व्हिडिओची दखल घेतली. त्यानंतर प्रसिद्ध गायक अजय-अतुल यांनी व्हायरल व्हिडिओची दखल घेत जयेशला संधी दिली.

जयेश खरे सारखाच खान्देशातील चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल

विशेष म्हणजे आता देखील जयेश खरे सारखा इयत्ता पाचवीत असणारा चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चिमुकल्याचं नाव अंशुमन मोरे असं आहे. अंशुमन मोरे याचे आई-वडील शेती करतात. त्याची घरची परिस्थिती बेताची आहे. पण त्याच्या कंठत साक्षात सरस्वती देवी वसलेली आहे. त्याचं गणं ऐकून माणूस मंत्रमुग्ध होतो. अहिराणी गायक जगदीश संधानशिव यांना हा हिरा गवसला. त्यानंतर जगदीशने अंशुमनला एक चांगली संधी दिली.

हे सुद्धा वाचा

जगदीश संधानशिव हा खान्देशातला लोकप्रिय गायक. त्याने अनेक अहिराणी गाणी गायली आहेत. त्याचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे. त्यावर त्याची सर्व गाणी आहेत. त्याची गाणी आतापर्यंत लाखो चाहत्यांनी ऐकली आणि पाहिली आहेत. या गाण्यांमुळे तो लोकप्रिय झालाय. या जगदीशची अंशुमनसोबत भेट घडून आली आणि एक नवा आविष्कार घडून आला.

जगदीशची दोन गाणी अंशुमनच्या आवाजात एका व्हिडिओतून प्रदर्शित करण्यात आली आहेत. या व्हिडिओला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसतोय. अनेकजण अंशुमनच्या आवाजची स्तुली करत आहेत. तर अंशुमनला संधी दिल्याबद्दल अनेकजण जगदीशचंही कौतुक करत आहेत. अंशुमनच्या गाण्याच्या व्हिडिओला तीन आठवड्यात आतापर्यंत 2.1 मिलियन म्हणजेच 21 लाख प्रेक्षकांनी पाहिलाय. जगदीश संधानशिवने अंशुमनची भेट कशी झाली याविषयी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बातचीत केली आहे.

जगदीशला लग्नात अंशुमनची माहिती मिळाली

मी सुरुवातीला माझ्या एका नातेवाईकाच्या लग्नाला गेलो असताना तिथे माझ्या नातेवाईकांनी मला या मुलाबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, अंशुमन मोरे राहणार विखरण (एरंडोल) या गावाचा असून त्याचा आवाज खूप सुंदर आहे. तर तुम्ही आमच्या गावाला या आणि या मुलाचा आवाज नक्की ऐका. त्यानंतर मी त्यांच्या गावाला जाऊन या मुलाची भेट घेतली”, असं जगदीशने सांगितलं.

“अंशुमनची घरची परिस्थिती खूप गरिबीची असून आई-वडील शेती काम करतात आणि तिथे मला या मुलाने चंद्रा चित्रपटचं गणं ऐकवलं. ते गाणं माझ्या कानावर पडताच मी मंत्रमुग्ध झालो. मला या मुलाचा आवाज खूप जास्त आवडला आणि माझ्या मनाला खूप भावला. मी तिथे विचार केला की मला या मुलाच्या आवाजात एक सॅड साँग करायला हवं, जे मी आधी माझ्या यूट्यूब चॅनलवर गायलेले आहे, ते गीत मी लिटल व्हर्जनमध्ये या मुलाच्या आवाजामध्ये तयार करणार असा विचार केला”, अशी प्रतिक्रिया जगदीशने दिली.

अंशुमनने गायलेलं गाणं ऐका आणि पाहा

वर्षी येथे गाणं रेकॉर्ड केलं

“मी आमच्या लहान गायकाला माझ्या गावी वर्षी येथे बोलून घेतलं आणि त्याच्याकडून या गाण्याची प्रॅक्टिस करून घेतली. प्रॅक्टिस केल्यानंतर या मुलाला मी रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये नेलं. तिथे त्याच्या आवाजात ‘राजा तू मन राजा पार्ट टू’ आणि ‘तुना प्यार मा पागल वयना ये’ हे दोन गाणी मी एस व्ही रेकॉर्डिंग स्टुडिओ डीजे सोहन वर्षी येते रेकॉर्ड केलं”, असं जगदीशने सांगितलं.

“या गीताला माझं संगीत आणि रचना असून या बालकाने या गीतात खूप मेहनत केली. हे गीत मी माझ्या यूट्यूबचॅनलवर अपलोड केलं. हे गीत एका दिवसाला एक लाख व्ह्यूज काढत होते आणि बघता बघता अवघ्या नऊ दिवसात हे गीत एक मिलनचा टप्पा पार करून गेलं”,  असं जगदीश म्हणाला.

अंशुमन मोरेच्या गाण्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद

“या लहान गायकाचा आवाज पूर्ण खान्देशभर आणि महाराष्ट्रभर लोकांच्या मनात घर करून गेलं आणि सर्व खान्देशातील आणि महाराष्ट्रातील सर्व रसिक मायबापांनी या गाण्याला उचलून धरलं. त्याच्या आवाजाला, त्याच्या मेहनतीला आणि आमच्या सपोर्टला सगळ्यांनी साथ दिली”, असं जगदीशने सांगितलं

“अंशुमन मोरे याच्या व्हिडिओला इन्स्टाग्रामच्या रिल्सला मिलियनच्यावर व्ह्यूज आणि लाखाच्यावर लाईक्स मिळाले. रसिक मायबापांनी या बालकाच्या मेहतीला खूप प्रेम आणि सपोर्ट दिला”, असं जगदीश म्हणाला.

“मला सर्व युट्युबला कमेंट करून सांगतात की ह्या मुलाच्या आवाजामध्ये अजून नवनवीन गीत येऊ देत. मी गायक संगीतकार गीतकार अभिनेता जगदीश संधानशिव मी या मुलाला एक संधी दिली आणि त्या संधीचं त्याने सोनं करुन दाखवलं”, असं जगदीश म्हणाला.

माझ्या आवाजासोबत या लहान गायक अंशुमन मोरेचं सॉंग पण रसिक माय बापांपर्यंत येत राहतील, अशी अपेक्षा करतो. सर्व रसिक मायबाप माझ्या सगळ्या गीतांना सपोर्ट करतील”, अशी आशा त्याने व्यक्त केली.

'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या.
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया.
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका.
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता.
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?.
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक.
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय.
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी.