‘इमानदार शिवसैनिक’ ते ‘छातीवर वार’, संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांना पुन्हा ललकारलं

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यात चांगलंच वाकयुद्ध रंगलं आहे. संजय राऊत यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या पाचोऱ्यातील सभेस्थळी जाऊन गुलाबराव पाटील यांना ललकारलं आहे. त्यामुळे जळगावातील आगामी काळातील घडामोडी महत्त्वाच्या आहेत.

'इमानदार शिवसैनिक' ते 'छातीवर वार', संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांना पुन्हा ललकारलं
Follow us
| Updated on: Apr 22, 2023 | 4:55 PM

जळगाव : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची उद्या पाचोऱ्यात भव्य सभा आयोजित करण्यात आलीय. या सभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे काल रात्रीपासून जळगावात (Jalgaon) दाखल झाले आहेत. संजय राऊत यांनी आज पाचोऱ्यात जाऊन सभास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना पुन्हा ललकारलं आहे. त्यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला.

“जळगावात कालपासून घुसलोय ना? घुसण्याची भाषा कुणी करावी, जे इमानदार शिवसैनिक आहेत, जे छातीवर वार झेलतात, जे अत्यंत कठीण प्रसंगातही आपल्या पक्षाबरोबर राहतात, त्याने मारण्याची गोष्ट करावी. जे पळकुटे आहेत, जे संकट काळात पळून जातात, त्यांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. हा जो भगवा झेंडा या व्यासपीठावर फडकतोय, त्या भगव्या झेंड्याचं तेज आहे. ते तेज सगळ्यांना पेलवत नाही”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

‘जो बेईमान, बाडगा असतो तो मोठ्याने बांग देतो’

“उद्याच्या सभेत आपण ते चित्र पाहाल. या भागामध्ये शेतकरी, कष्टकरी वर्ग आणि कडवट शिवसैनिक आहेत. आर ओ तात्यांचा हा मतदारसंघ आहेत. त्यांनी मधल्या काळात काही बदल केले. हा त्यांचा निर्णय होता. पण या पुढे हा मतदारसंघ आर ओ तात्यांच्या खऱ्या वारसदारांकडेच राहील. त्या दृष्टीकोनाने वैशाली ताईंनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“मला सुरक्षेची काय गरज आहे? मला सुरक्षेची कधीच गरज पडली नाही. वाघाला सुरक्षेची गरज लागते का? या ना, मी समोर जाणारा माणूस आहे. मला बंदुकवाले, बॉडिगार्ड तुम्ही कधी बघता का माझ्या बाजूने? असले तरी मी बाजूला करतो. मी एकटाच फिरतो. शिवसैनिक असतात, अजून काय पाहिजे? शिवसैनिकांच्या अंगावर जाणं सोपं नाही. डरकाळ्या खूप फोडतात. जो बेईमान, बाडगा असतो तो मोठ्याने बांग देतो. तसं मी सध्या जळगावात पाहतोय”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली.

उद्धव ठाकरे यांचा उद्याचा दौरा नेमका कसा असेल?

“उद्या सभा आहे, त्या सभेची तयारी पूर्ण झाली आहे. उद्या सभा होणारच आहे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आर ओ तात्या यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. गेल्या काही काळापासून तो कार्यक्रम थांबला होता. कोविड आणि इतर काही राजकीय घडामोडी घडल्या. पण आर ओ तात्या यांचे शिवसेना आणि ठाकरे कुटुंबासोबत खूप जिव्हाळ्याचे संबंध होते. जळगाव, पाचोरा म्हटलं की आर ओ तात्या. आर ओ तात्या यांनी राजकारणात जे काम केलं त्याहीपेक्षा त्यांनी कृषी क्षेत्रात केलेलं काम अत्यंत महत्त्वाचं आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

“उद्या उद्धव ठाकरे येतील तेव्हा निर्मल सीड्सच्या वास्तूत जातील. तिथे काही काळ थांबतील. मग पुतळ्याचं अनावरण करतील. तात्यांनी सुरु केलेल्या एका शाळेत त्यांच्या पुतळ्याचं अनावरण होईल. मग प्रयोगशाळेचं उद्घाटन होईल. त्यानंतर ते सभास्थळी येतील. सभेची तयारी तुम्ही पाहताय. या सभेची महाराष्ट्रात चर्चा आहे. ही सभा कशी करतात, आव्हानं-प्रति आव्हान देण्याचा प्रयत्न खूप झाला. पण संपूर्ण पाचोरा या सभेसाठी जळगावपासून शिवसैनिकांनी मेहनत घेतली”, असं राऊत यांनी सांगितलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.