Eknath Khadse: ‘या’साठी मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी द्यावी, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचे गणरायाला काय साकडे?
एकनाथ खडसे म्हणाले की- मी गणपतीला विनंती करतो की पालकमंत्री नेमण्याची मुख्यमंत्र्यांना लवकरात लवकर बुद्धी द्यावी. राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे. त्यामुळे जनता त्रस्त आहे. त्याची वेदना आहे. त्यामुळे लवकरात लवकर पालकमंत्री नेमून गावागावांपर्यंत बैठका घेऊन सरकार सक्रिय व्हावे.
जळगाव – राज्यातील सत्तासंघर्षाचा मुद्दा सध्या सुप्रीम कोर्टात आहे. गेल्या काही महिन्यांपासून या प्रकरणावर सप्रीम कोर्टात (Supreme court)सुनावणी सुरु आहे. शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde)असा हा वाद कोर्टात रंगलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा, एकनाथ शिंदे यांचा शपथविधी, बहुमतचाचणी या सगळ्याच प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या भीतीमुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्तार लांबवावा लागला अशी टीका जळगावातील राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे. मंत्रिमंडळ विस्तार जरी झाला असला तरी अद्याप पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत, यावरु खडसे (Eknath Khadse)यांनी शिंदे सरकारला लक्ष्य केले आहे. राज्यातील जिल्ह्यांना पालकमंत्री नेमण्याची मुख्यमंत्र्यांना लवकरात लवकत सद्बुद्धी गणरायाने द्यावी, असे साकडे त्यांनी गणपतीला घातल्याचे सांगितले आहे.
मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी द्यावी- खडसे
एकनाथ खडसे म्हणाले की- मी गणपतीला विनंती करतो की पालकमंत्री नेमण्याची मुख्यमंत्र्यांना लवकरात लवकर बुद्धी द्यावी. राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे. त्यामुळे जनता त्रस्त आहे. त्याची वेदना आहे. त्यामुळे लवकरात लवकर पालकमंत्री नेमून गावागावांपर्यंत बैठका घेऊन सरकार सक्रिय व्हावे. असे साकडे एकनाथ खडसे यांनी गणपतीला घातले आहे. मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची भीती असल्याने मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार व पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या लांबवल्या असाव्यात असा चिमटाही एकनाथ खडसे यांनी काढला आहे.
30-35 वर्षात विरोधकांना नाथाभाऊ उरून पुरला – खडसे
जळगाव जिल्ह्यात शून्यातून भाजप उभा राहिला, याचे श्रेय आपले असल्याचेही खडसे यांनी म्हटले आहे. अनेक आमदार-खासदारांना जिल्ह्यात निवडून आणले. असेही त्यांनी सांगितले. जसं एखाद्या पार्टीचे यश असते तसेच ते नेतृत्वातही यश असते, असे सांगत त्यांनी भाजपावर टीका केली आहे. गेल्या 30 ते 35 वर्षापासून नाथाभाऊ विरोधकांना उरून पुरला असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यावेळी भाजपात होतो, त्यावेळी नागरिकांनी मला चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात शून्यातून भाजप उभा राहिला व अनेक आमदार-खासदार जिल्ह्यातून निवडून आले, असे त्यांनी म्हटले आहे. विरोधकांना आपल्याला नाउमेद केल्याशिवाय यश मिळणार नाही, त्यामुळे सर्वच विरोधक एकवटले असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.