वाद, मग दोन गट आमनेसामने, जाळपोळ, तोडफोड, हाहा:कार… पाळधीमध्ये काय-काय घडलं? वाचा A टू Z

शिवसेनेचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी या गावात दोन गटात वाद होवून वादाचे पर्यवसन जाळपोळ आणि दुकानाच्या तोडफोडीपर्यंत पोहोचलं. घटनेमध्ये अज्ञात व्यक्तीकडून पाळधी गावातील पाच दुकाने, चारचाकी पेटविण्यात आल्याने मोठा तणाव निर्माण झाला असून गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रशासनाला पाळधी गावात उद्या पहाटे सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करावी लागली.

वाद, मग दोन गट आमनेसामने, जाळपोळ, तोडफोड, हाहा:कार... पाळधीमध्ये काय-काय घडलं? वाचा A टू Z
Follow us
| Updated on: Jan 01, 2025 | 7:59 PM

किशोर पाटील, Tv9 प्रतिनिधी, जळगाव : पाळधी हे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे गाव आहे. याच गावात मंत्री गुलाबराव पाटील हे कुटुंबासह राहतात. काल 31 डिसेंबरला रात्री मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी ह्या चारचाकीतून जात होत्या. यावेळी एका ठिकाणी काही तरुण उभे होते. चालकाने हॉर्न वाजविल्यानंतरही तरुण बाजूला झाले नाहीत. त्यांनतर चालक खाली उतरून तरुणांना बाजूला होण्यासाठी सांगायला गेला. यावेळी संबंधित तरुणांनी त्याला थेट शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान तरुणांची समजूत काढण्यासाठी वाहनातून खाली उतरलेल्या मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नीला सुद्धा तरुणांनी अरेरावी करत शिवीगाळ केली. त्यावरून दोन गटात वाद होऊन दोन्ही गट आमने-सामने आल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे.

तरुणांच्या दोन गटातील वादाचे रूपांतर जाळपोळीमध्ये झालं. तरुणांच्या एका गटाने बस स्थानक परिसरातील पाच दुकानांना पेटवून दिले. त्यानंतर मार्केटमधील दुकानांची तोडफोड केली. तर याच दरम्यान काही वाहनांना सुद्धा पेटवण्यात आलं. यामुळे पाळधी गावात मोठा तणाव निर्माण झाला. घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने जळगाववरून दंगल नियंत्रक पथकाच्या तीन तुकड्या तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. यानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. रात्रभर अधिकारी गावात ठाण मांडून होते. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर सात ते आठ जणांना पोलिसांनी अटक केली.

25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

तरुणांच्या दोन गटातील अंतर्गत भांडणामुळे वाद झाला. त्यातून जाळपोळ झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सात ते आठ जणांना ताब्यात घेतल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. गावात शांतता राहावी यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी कायदा आणि सुव्यवस्था पाळावे, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

दुकानदारांनी सांगितला मन हेलावणारा घटनाक्रम

या घटनेत जाळण्यात आलेले चार ते पाच दुकान पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. त्यातील साहित्य आणि दुकान असं लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचं दुकानदारांनी सांगितलं. नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद करून घरी गेल्यावर थेट पोलिसांकडून घटनेची माहिती मिळाली. आल्यानंतर दुकाने जळत होती. आपण विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत दुकान आणि त्यातील सर्व साहित्य खाक झालं होतं, अशी करुण कहाणी दुकानदारांनी सांगितली.

गावात सद्यस्थितीत तणावपूर्ण शांतता

सद्यस्थितीत पाळधी गावामध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. उद्या पहाटे सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. पाळधी गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कुटुंबाकडून पोलिसात कुठलीही तक्रार देण्यात आली नसल्याची माहिती सुद्धा आहे. याप्रकरणी ज्यांची दुकान, वाहनं जाळण्यात आली त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान मंत्र्यांच्याच पाळधी गावात त्यांच्या पत्नीला शिवीगाळ होवून, दोन गटातील वाद विकोपाला गेला. पुढे जाळपोळ झाल्याच्या घटनेची संपूर्ण जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दोन गटातील वादामुळे पाळधी गावातील ग्रामस्थांना संचारबंदीचा सामना करण्याची वेळ आली.

संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.