आम्ही क्राइम ब्रांचचे पोलीस, अंगावरचे दागिने डिक्कीत ठेवा म्हणाले अन् पाहता पाहता… जालन्यात काय घडलं?
आम्ही क्राइम ब्रांचचे पोलीस आहोत असं सांगितलं. तसेच रस्त्यात पुढे तपासणी सुरु आहे, असे सांगून तुमच्या गाडीची डिक्की तपासू द्या अशी बतावणी केली. या दरम्यान तुमच्याही अंगावरचे दागिने काढून डिक्कीत दागिने ठेवण्यास सांगितले.
जालनाः आम्ही क्राइम ब्रांचचे पोलीस (Crime Branch police) आहोत, असं सांगून एका महिलेची स्कुटी अडवण्यात आली. तपासण्यासाठी तिची डिक्की उघडायला लावली. एवढंच नाही तर पुढे तपासणी (Checking for security) सुरु आहे, त्यासाठी तुमच्या अंगावरचे सगळे दागिने काढून डिक्कीत सुरक्षित ठेवा, असंही सांगितलं. महिलेने या लोकांनी सांगितल्याप्रमाणे केले. भामट्यांनी दागिने डिक्कीत ठेवता ठेवता महिलेची दिशाभूल केली आणि तब्बल सव्वा लाख रुपये किंमतीचे दागिने हातोहात लंपास केले. जालन्यातील (Jalna Crime) अमरछाया टॉकिज जवळ बुधवारी दुपारी ही घटना घडली. भर दिवसा अशी घटना घडल्याने महिला वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
काय घडला नेमका प्रकार?
जालना शहरातील म्हाडा कॉलनी भागातील लीला मदनलाल सोनी या बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास भाजीपाला खरेदी करण्यासाठी स्कूटीवरून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडून फुले मार्केटकडे जात होत्या. त्याना अमरछाया टॉकिजजवळ दोन भामट्यांनी अडवले. आम्ही क्राइम ब्रांचचे पोलीस आहोत असं सांगितलं. तसेच रस्त्यात पुढे तपासणी सुरु आहे, असे सांगून तुमच्या गाडीची डिक्की तपासू द्या अशी बतावणी केली. या दरम्यान तुमच्याही अंगावरचे दागिने काढून डिक्कीत दागिने ठेवण्यास सांगितले. लीला सोनी यांच्या गळ्यातील, हातातील, बोटातील सुमारे 1 लाख 17 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने काढण्यास सांगून स्कूटीच्या डिक्कीत ठेवण्यास सांगितले.
दागिने डिक्कीत ठेवले अन् क्षणात दिशाभूल
भामट्यांनी केलेल्या बनावात लीला सोनी फसल्या. त्यांनी अंगावरचे दागिने डिक्कीत ठेवण्यासाठी काढले आणि चोरट्यांनी क्षणात दिशाभूल केले आणि दागिने लांबवले. या प्रकारानंतर सोनी यांनी तातडीने सदर बाजार पोलीस ठाणे गाठले. घडल्या प्रकाराची तक्रार दाखल केली. या घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन, पोलीस उपनिरीक्षक नागनाथ भताने, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ आदींनी तातडीने घटनास्थळी भेट घेतली. विविध पथके तपासासाठी रवाना केली.
इतर बातम्या-