Chandrakant Khaire : आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार; महाराष्ट्रात पुन्हा भूकंप होणार? शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितला तो खास प्लॅन
Chandrakant Khaire : राजकारणात केव्हा काय होईल? असे सांगता येत नाही. राजकारणात कोणीच अस्पृश्य नसतो, असे म्हणतात. त्यामुळे शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या एका दाव्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

राजकारणात केव्हा काय होईल? असे सांगता येत नाही. राजकारणात कोणीच अस्पृश्य नसतो, असे म्हणतात. आदित्य ठाकरे हे 2029 मध्ये मुख्यमंत्री होतील, असा दावा माजी खासदार आणि शिवसेना नेत चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. 2029 मध्ये आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील असे भाकीत त्यांनी वर्तवलं आहे. त्यांच्या या दाव्याने राज्याच्या राजकारणात येत्या काही दिवसात राजकीय भूकंप होणार का? याची चर्चा रंगली आहे.
हम फिर वापस आने वाले है
मैदान अभी आगे है हम फिर वापस आने वाले है, असा इशारा त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे. जालना जिल्ह्यात एका लग्न सोहळ्यासाठी त्यांनी हजेरी लावली होती. या वेळी त्यांनी भाजप आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्यावर तोफ डागली. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका होतील आणि ते मुख्यमंत्री होतील, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला.




दानवे यांच्यावर धरला निशाणा
रावसाहेब दानवे विचित्र माणूस आहे, अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली. पुढच्या निवडणुकीपर्यंत शिवसेना (उबाठा) राहत नाही या रावसाहेब दानवे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. रावसाहेब दानवे यांनी शिवसेना पुढील निवडणुकीपर्यंत राहत नाही या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना चंद्रकांत खैरे यांनी रावसाहेब दानवे यांच्यावरती जोरदार टीका केली. रावसाहेब दानवे यांनी सिग्मा हॉस्पिटल मध्ये बसून माझा पराभव केला त्यांनी भाजपच्या नगरसेवकांसह आमच्याही नेत्यांना पैसे दिले त्यामुळे माझा पराभव झाला असे देखील खैरे म्हणाले.
आमच्याच नगरसेवक आणि नेत्याला पैसे देऊन दानवेंनी मला पराभूत केले. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत देवाने दानवे यांना जालन्यात पराभूत केले, असा टोला खैरे यांनी लगावला. एकीकडे भाजपाकडून मुलगा तर दुसरीकडे शिंदे गोटातून मुलगी निवडून आणली. महायुतीने एकाच घरात दोन तिकिटं दिली, हे कसं चालतं असा सवाल करत मैदान पुढं आहे, आम्ही पुन्हा परत येणार, असा इशारा देखील खैरे यांनी दिला.