Jalna Man burned : जालन्यात पेट्रोल टाकून इसमाला पेटवण्याचा प्रयत्न, कामावरुन काढून टाकल्याच्या रागातून कृत्य
जालना शहरातील टाऊन हॉल परिसरामध्ये तुकाराम मंडळ नावाच्या 50 वर्षीय सेल्समनला पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली. तुकाराम मंडळ यांच्या लुडबुडीमुळे मालकाने आपल्याला कामावरुन काढून टाकल्याचा राग मनात देशमुख यांच्या मनात होता. याच रागातून बुधावरी दुपारी 12 वाजता आरोपी सुरेश देशमुख याने मंडळ यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना आग लावली.

जालना : जालना शहरातील टाऊन हॉल परिसरातील थरारक घटना समोर आली आहे. एका 50 वर्षाच्या इसमावर पेट्रोल टाकून जाळून (Burned) मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मालकाने नोकरी (Job)वरून काढल्याने मनात राग धरून कारणीभूत ठरणाऱ्या व्यक्तीला जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घडली असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही (CCTV)मध्ये कैद झाली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सुरेश देशमुख असे आरोपीचे नाव आहे तर तुकाराम मंडळ असे पीडित इसमाचे नाव आहे.
कामावरुन काढून टाकल्याच्या रागातून आरोपीचे कृत्य
जालना शहरातील टाऊन हॉल परिसरामध्ये तुकाराम मंडळ नावाच्या 50 वर्षीय सेल्समनला पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली. तुकाराम मंडळ यांच्या लुडबुडीमुळे मालकाने आपल्याला कामावरुन काढून टाकल्याचा राग मनात देशमुख यांच्या मनात होता. याच रागातून बुधावरी दुपारी 12 वाजता आरोपी सुरेश देशमुख याने मंडळ यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना आग लावली. या आगीत तुकाराम मंडळ 50 टक्के भाजले असून त्यांच्यावर औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मंडळ यांच्या तक्रारीवरून आरोपी सुरेश देशमुख यांच्या विरोधात कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. (Attempt to burn a person by throwing petrol in a job dispute in jalna)