Railway | मराठवाड्यातला महत्त्वाचा रेल्वेमार्ग, जालना-जळगाव मार्गाच्या सर्व्हेसाठी पथक दाखल, विविध गावांना भेटी देणार

औरंगाबादः मराठवाड्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या जालना ते जळगाव रेल्वे मार्गाच्या अंतिम सर्व्हेला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी मंजुरी दिली आहे. रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी साडे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. जालना ते जळगाव (Jalna to Jalgaon) हा 174 किलोमीटर लांबीचा मार्ग असून त्याच्या सर्वेक्षणाचे काम सुरु झाले आहे. हे सर्वेक्षण […]

Railway | मराठवाड्यातला महत्त्वाचा रेल्वेमार्ग, जालना-जळगाव मार्गाच्या सर्व्हेसाठी पथक दाखल, विविध गावांना भेटी देणार
जालना रेल्वे स्टेशन
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 3:27 PM

औरंगाबादः मराठवाड्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या जालना ते जळगाव रेल्वे मार्गाच्या अंतिम सर्व्हेला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी मंजुरी दिली आहे. रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी साडे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. जालना ते जळगाव (Jalna to Jalgaon) हा 174 किलोमीटर लांबीचा मार्ग असून त्याच्या सर्वेक्षणाचे काम सुरु झाले आहे. हे सर्वेक्षण 23 ते 25 मार्च या कालावधीत होणार असून त्यासाठी रेल्वे विभागाचे अधिकारी  जालन्यात दाखल झाले आहेत. विभागाचे हे अधिकारी जालना ते जळगाव (Jalgaon) मार्गावरील विविध गावांना भेटी देणार आहेत. त्यानंतर रेल्वेमार्गासंबंधीचा अहवाल रेल्वे विभागाकडे दिला जाईल. हा रेल्वे मार्ग झाल्यानंतर मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील औद्योगिक विकासासह, व्यापार, दळणवळण, शेती, लघुउद्योग आणि पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.

तीन सदस्यांचं पथक

मुंबई येथील मुख्य परिचलन अधिकारी व्ही. नलीन, मुख्य दळणवळण अधिकारी रविप्रकाश गुजराल व मुकेश लाल या तीन सदस्यांची टीम जालना-जळगाव रेल्वे मार्गाचे अंतिम सर्वेक्षण करणार आहे. यात अधिकारी जालना, राजूर गणपती, तहसील कार्यालय भोकरदन, सिल्लोड, अजिंठा व जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी भेटी देणार आहेत.

मराठवाड्यासाठी महत्त्वाचा मार्ग का?

– जालना ते जळगाव हा रेल्वेमार्ग जालना, पिंपळगाव, पांगरी, राजूर, भोकरदन, सिल्लोडमार्गे गोळेगाव, अजिंठा, फर्दापूर, जळगावपर्यंत जाणार आहे. – 174 किमीच्या या मार्गाद्वारे जगप्रसिद्ध अजिंठा लेण असलेले हे ठिकाण रेल्वे मार्गाला जोडले जाईल. – जालना ते जळगाव रेल्वे मार्गामुळे मराठवाड्यातील ग्रामीण भागातील औद्योगिक विकासासह, शेती, व्यापार, दळणवळण, व्होकल फॉर लोकल, लघुउद्योगाच्या विकासाला चालना मिळेल. – या मार्गापैकी 70 टक्के मार्ग जालना लोकसभा क्षेत्रातून जात आहे. – याचा फायदा सुरत, गुजरात, राजस्थानच्या गाड्यांना आंध्रप्रदेशकडे जाण्यासाठी छोटा मार्ग म्हणून होणार आहे.

महत्त्वाकांक्षी प्रकल्प

जालना ते जळगाव या 174 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाचे आता फायनल लोकेशन सर्वेक्षण केले जात आहे. यासाठी साडे चार कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. हा रेल्वे मार्ग झाल्यानंतर मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील औद्योगिक विकासासह, व्यापार, दळणवळण, शेती, लघुउद्योग आणि पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.

इतर बातम्या-

Health care tips : उन्हाळ्यात अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी ‘या’ खास पदार्थांचा आहारात समावेश करा!

IPL 2022 साठी स्टेडियममध्ये फॅन्सना मिळणार एन्ट्री, तिकिटं कुठे मिळणार? काय असतील दर? जाणून घ्या सर्व डिटेल्स

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.