भाजपचे बडे नेते सुब्रमण्यम स्वामी यांचे शिंदे-फडणवीस सरकारवर ताशेरे, एकनाथ शिंदे गटाची नेमकी भूमिका काय?

सुब्रमण्यम स्वामी यांनी शिंदे-फडणवीस सरकारबद्दल केलेले्या विधानावर आता शिंदे गटाकडून भूमिका मांडण्यात आली आहे.

भाजपचे बडे नेते सुब्रमण्यम स्वामी यांचे शिंदे-फडणवीस सरकारवर ताशेरे, एकनाथ शिंदे गटाची नेमकी भूमिका काय?
Follow us
| Updated on: Dec 24, 2022 | 6:09 PM

संजय सरोदे, जालना : महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात कधी काय होईल याचा काहीच भरोसा नाही. एकेकाळी भाजपची खमक्यापणाने बाजू मांडणारे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आज जणूकाही स्वत:चा पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारलं आहे की काय? अशी परिस्थिती निर्माण झालीय. त्यामागचं कारणही अगदी तसंच आहे. कारण सुब्रमण्यम स्वामी यांनी आजच्या पंढरपूर दौऱ्यादरम्यान धक्कादायक विधानं केली आहेत. विशष म्हणजे त्यांनी आज राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर ताशेरे ओढले आहेत. शिंदे-फडणवीस सरकार हे अनैतिक सरकार असल्याचं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलंय. त्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. भाजपचा इतका मोठा नेता एवढं मोठं विधान करतो तेव्हा राजकीय वर्तुळात खळबळ माजणं अर्थातच स्वभाविक आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या वक्तव्यावर आता शिंदे गटाकडूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

शिंदे गटाचे उपनेते आणि माजी खासदार अर्जुन खोतकर यांनी सुब्रमण्यम स्वामी यांच्या विधानावर भूमिका मांडलीय. त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत आश्चर्य व्यक्त केलंय.

“एवढी मोठी माणसं असं बेताल बोलतात तरी कसं? हे समजतच नाही. शिंदे सरकार संविधानाच्या चौकटीत राहून स्थापन झालेलं आहे”, अशी प्रतिक्रिया अर्जुन खोतकर यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

“आपली लोकशाही संख्या बळावर अवलंबून आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेत त्या संविधानाच्या चौकटीत राहून हे सरकार स्थापन केलल आहे”, अशी भूमिका अर्जुन खोतकर यांनी मांडली.

सुब्रमण्यम स्वामी शिंदे-फडणवीस सरकारवर नेमकं काय म्हणाले?

“शिंदे-फडणवीस सरकार महाविकास आघाडी तोडून बनवलं आहे. निवडणूक लढवून सरकार निर्माण केलेलं नाही. आमदार फोडून सरकार बनवलं हे बरोबर नाही. हरयाणात एकदा शंभर टक्के इंदिरा काँग्रेस झाली होती. हा जोक मी पाहिला आहे. त्यावर लोक हसत होते. त्यामुळे इंदिरा गांधींची खूप बदनामी झाली होती. आता आमचीही बदनामी झाली आहे”, अशी रोखठोक भूमिका सुब्रमण्यम स्वामी यांनी मांडली.

“सरकार फोडून नवं सरकार बनवण्याची गरज नव्हती. विरोधात बसून आघाडीची पोलखोल करायची होती. ही खिचडी होती अधिक काळ चालली नसती”, असं वक्तव्य सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.