Manoj jarange Patil | अंतरवली सराटी दगडफेक प्रकरणात पहिली अटक, अजित पवार थेट म्हणाले…
Manoj jarange Patil | अंतरवली सराटीमध्ये दगडफेक आणि जाळपोळ झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. पोलिसांनी पहिली अटक केली. आरोपीकडे पिस्तुल आणि जिवंत काडतूस सापडली आहेत. अजित पवार यांनी या कारवाईवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
जालना (दत्ता कनवटे) : दोन महिन्यांपूर्वी अंतरवली सराटीमध्ये दगडफेक आणि जाळपोळ झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी पहिली अटक केली आहे. ऋषीकेश बेदरे या मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली. जालना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. काल सायंकाळी 6 ते 7 वाजण्याच्या सुमारास ही अटक करण्यात आली. मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले होते. त्यावेळी तिथे पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर हे प्रकरण तापलं. याचवेळी पोलिसांवर सुद्धा दगडफेक झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी आता कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ऋषीकेश बेदरे आणि त्याच्या 3 सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी ऋषीकेशकडून पिस्तुल आणि जिवंत काडतूस जप्त केली आहेत.
अंबड पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये आरोपींचा मुक्काम आहे. अंबड पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. आज सकाळी 11 वाजता अंबड अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपीला हजर करण्यात येणार आहे. त्यावेळी आरोपींना जामीन मिळतो कि, पोलीस कोठडी हे समजेल. जामीन मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण 307 सारख गंभीर कलम लावण्यात आलं आहे. अतरावली सराटीमध्ये झालेल्या दगडफेकीत पोलीस आणि ग्रामस्थ जखमी झाले होते. धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड जाळपोळ करण्यात आली होती. अतरवली-सराटीमध्ये जे घडलं. ते गुन्हे रद्द करण्यात यावेत अशी मागणी करण्यात येत होती. पण आता पोलिसांनी आक्रमक पाऊल उचललं आहे. अटकेवर मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?
“या प्रकरणात पोलीस दबावाला बळी न पडता कारवाई करतील. तपासातून वस्तुस्थिती समोर येईल आणि ज्यांच्या चूक असतील, त्यांना कडक शासन होईल” असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. पोलिसांनी दोन महिन्यांनी पहिली अटक केली आहे, या अटकेवर मनोज जरांगे पाटील यांनी आमच्या लोकांना अटक करण्याचा हा कुठला डाव ? असा प्रश्न विचारलाय. “सरकारने आमच्या कार्यकर्त्याना विनाकारण अटक केली. अंतरावली सराटीत आमच्यावर हल्ला झाला. आम्ही कट रचला नव्हता” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.