कोरोना संकटातही आरोग्य खातं खणखणीत सांभाळणारे मंत्री! जालन्याचे आमदार राजेश टोपे यांच्या कारकीर्दीवर धावती नजर

नवा विषाणू येवो की लॉकडाऊनचा निर्णय असोत, ऑक्सिजन बेडची कमतरता असो की रुग्णांचा वाढता आलेख असो, राज्याच्या वतीनं आरोग्य खात्याचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या या नेत्याला पुढे येऊन स्पष्टीकरण द्यावंच लागतं. आज 11 जानेवारी हा राजेश टोपे यांचा वाढदिवस, यानिमित्ताने जालन्यातल्या या राजकारणी सुपुत्राची थोडक्यात ओळख!

कोरोना संकटातही आरोग्य खातं खणखणीत सांभाळणारे मंत्री! जालन्याचे आमदार राजेश टोपे यांच्या कारकीर्दीवर धावती नजर
आरोग्यमंत्री राजेश टोपे
Follow us
| Updated on: Jan 11, 2022 | 2:32 PM

जालनाः कोणतंही संकट ओढवलं की आधी प्रशासन काय पावलं उचलतं, कोणता निर्णय घेतं, संकटांना किती खंबीरपणे सामोरं जातं, याकडे आधी लक्ष वेधलं जातं.  अवघ्या जगासाठीच नवीन असलेल्या कोरोना संकटाला स्थानिक पातळीपासून राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील सरकारं धीरानं सामोरं जात आहेत. महाराष्ट्रातही या संकटानं कधीही भरून न येणारं नुकसान झालंय. पण वेळोवेळी योग्य उपाययोजना राबवून, प्रसंगी कठोर निर्णय घेऊन, नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी पेलणारे मंत्री (Health Minister) म्हणून राजेश टोपे (Rajesh Tope) यांचं नाव नेहमीच चर्चेत असतं. नवा विषाणू येवो की लॉकडाऊनचा निर्णय असोत, ऑक्सिजन बेडची कमतरता असो की रुग्णांचा वाढता आलेख असो, राज्याच्या वतीनं आरोग्य खात्याचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या या नेत्याला पुढे येऊन स्पष्टीकरण द्यावंच लागतं. आज 11 जानेवारी हा राजेश टोपे यांचा वाढदिवस, यानिमित्ताने जालन्यातल्या या राजकारणी सुपुत्राची थोडक्यात ओळख!

संस्थांचे जाळे अन् राजकारणाचा वारसा

मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार कै. अंकुशराव टोपे हे जालन्या जिल्ह्यातील मोठे प्रस्थ होते. 1972 ते 1978 दरम्यान अंकुशराव यांनी जालन्यातील अंबड विधानसभा मतदारसंघावर नेतृत्व गाजवले. तर 1991 ते 96 पर्यंत जालना लोकसभा मतदारसंघाचे नेत-त्व केले. औरंगाबाद जिल्हा परिषदेचे ते सदस्यही होते. अंकुशराव टोपे यांनी उभारलेल्या अनेक राजकीय, सामाजिक संस्थांची धुरा आपोआपच पुत्र राजेश टोपे यांच्याकडे आहे. यात दोन सहकारी साखर कारखाने, 12 शाखांचे जाळे असलेली समर्थ सहकारी बँक, 50 पेक्षा जास्त शाळा-महाविद्यालये असलेली मत्स्योदरी शिक्षण संस्था, सहकारी सूतगिरणी, अभियांत्रिकी महाविद्यालय आणि सैनिका शाळा इत्यादी संस्थांची जबाबदारी सांभाळतच राजेश टोपे यांच्यातील राजकीय प्रगल्भता वाढत गेली. जिल्हा बँकेवर अजूनही त्यांचे वर्चस्व असून जिल्हा परिषदेतील सत्तेत त्यांचा पक्ष सहभागी आहे. अंबड आणि घनसावंगीतील पंचायत समित्या, खरेदी विक्री संघ, बाजार समिती, नगरपंचायत त्यांच्या अधिपत्याखाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा संघटनाची संपूर्ण जबाबदारीही ते उत्तमरित्या पेलतात.

इंजिनिअर ते राज्याचे आरोग्यमंत्री!

राजेश टोपे यांचा जन्म जालन्यात 11 जानेवारी 1969 रोजी झाला. वडील अंकुशराव टोपे यांच्यामुळे घरातच राजकारणाचा वारसा असूनही राजेश टोपे यांनी आधी शिक्षणाला महत्त्व देत अभियांत्रिकीची पदवी घेतली. राजेश टोपे यांची राजकारणातील खरी सुरुवात 1996 मधील पराभवाने झाली. लोकसभा निवडणुकीत पराभव झाला, पण पुढे 1999 मध्ये घनसावंगी विधानसभा मतदार संघातून ते विजयी झाले. तेव्हापासून सलग पाच वेळा त्यांनी विधानसभेवर नेतृत्व गाजवले. 1999 मध्ये त्यांनी पहिल्यांदा राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु पक्षांतर्गत कारणामुळे त्यांना हे पद काही दिवसातच सोडावे लागले. नंतर 2001 मध्ये त्यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागली. त्यापुढे सलग 14 वर्षे जलसंधारण, ऊर्जा, पर्यावरण, नगरविकास, कमाल नागरी जमीन धारणा, उच्चव तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, सामान्य प्रशासन, संसदीय कार्य इत्यादी खात्यांचा कार्यभार त्यांनी चोख सांभाळला.

2019 ची निवडणूक संघर्षाची!

2016 मध्ये वडील अंकुशराव टोपे यांच्या निधनानंतर 2019 मधील विधानसभा निवडणूक लढवण्याकरिता राजेश टोपे यांच्यासमोर मोठं आव्हान होतं. अंकुशराव टोपे यांच्या हयातीत त्यांनी विधानसभेच्या चार निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या. वडील हयात नसताना त्यांनी लढवलेली ही पहिलीच निवडणूक होती. यावेळेस राजकीय विरोधकांनी टोपे यांच्या पराभवासाठी चांगलेच प्रयत्न केले. परंतु संस्थात्मक जाळे, व्यापक जनसंपर्क आणि स्वयंशिस्त या त्रिसूत्रीच्या जोरावर त्यांनी विजय मिळवला. 30 डिसेंबर 2019 रोजी महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत त्यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री म्हणून शपथ घेतली.

शिस्तप्रिय नेते म्हणून ओळख!

कोरोना संकटात महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याची धुरा खंबीरपणे सांभाळणारे राजेश टोपे हे व्यक्तीगत जीवनात अत्यंत शिस्तप्रिय असून विकासाची कास धरणारे नेते आहेत. जालनेकर आणि कार्यकर्त्यांमध्ये राजेश भैय्या टोपे या नावाने ते परिचित आहेत. मागील दोन वर्षांच्या काळात विरोधकांकडूनही अनेकदा टीका सोमोरे जावे लागले. पण संस्थांच्या कारभाराची सवय असलेल्या राजेश टोपेंना विरोधकांशी सामना करायचीही सवय आहे. सर्वांचे ऐकायचे आणि आपल्याला हवे तेच काम संयमीपणे करायचे, असा त्यांचा स्वभाव जालनेकरांना परिचित आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करतानाही ते तितक्याच संयमीपणे कारभार करतील, अशी अपेक्षा आहे.

इतर बातम्या-

Nashik Corona| कोरोनाबाधित 5 हजारांच्या पुढे, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.64 टक्क्यांवर, काय आहे भीती?

Nagpur | ‘संक्रांत’ येऊ नये म्हणून सावध व्हा! नायलॉन मांजाने गळे कापणे सुरूच; पोलिसांची धडक कारवाई

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.