
जालना जिल्ह्यातील जाफराबात तालुक्यातील डोणगावमधील लोकांनी हे आंदोलन केलं. गुरुवारी गावातील टाकीवर काही ग्रामस्थ चढले. ग्रामपंयातीने पाणीपुरवठ्याची योग्य व्यवस्था लावावी, अशी मागणी त्यांनी केली.

जाफराबाद तालुक्यात डोणगावजवळ सावखेडाभुई तलाव आहे.. त्यात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे.. मात्र ग्रामपंचायतच्या निष्क्रीयतेमुळं गावातला पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळं गावातील महिलांना दोन ते तीन किलोमीटरवरून पाणी आणावं लागतंय, त्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं.

ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेमुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे. आज गावातील काही ग्रामस्थांनी शोलेस्टाईल आंदोलन केलं.. दरम्यान दोन ते तीन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय..

शोले स्टाइल आंदोलनात ग्रामपंचायीतीतील सदस्यांनीच सहभाग घेतला. डोणगावाजवळील तलावातून गावाला पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था लवकरात लवकर करा, अशी मागणी त्यांनी केली.