सरकारचा डाव आहे की, यावर्षी…; मनोज जरांगे पाटील यांचं मोठं विधान

Manoj Jarange Patil on CM Eknath Shinde : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. सग्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीबाबतही मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच 13 तारखेपर्यंत सरकार निर्णय घेईल, असा विश्वासही जरांगेंनी व्यक्त केलाय. वाचा...

सरकारचा डाव आहे की, यावर्षी...; मनोज जरांगे पाटील यांचं मोठं विधान
मनोज जरांगे पाटीलImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jul 04, 2024 | 7:03 PM

सरकारकडे यंत्रणा आहे. आम्ही आंदोलक आहोत. आम्हाला विश्वास ठेवावा लागेल. धोका होईल, नाही होईल हा भाग वेगळा आहे. आपल्याला दिलेला शब्द पाळतील न पाळतील हा विषय वेगळा आहे. एक आंदोलक म्हणून समाजाची जवाबदारी आपण पेलतो. तर सरकारवर विश्वास ठेवावा लागतो. आडमुठी भूमिका घेतल्याने समाजाचे कल्याण होणार नाही. शंभूराजे देसाई ज्यावेळी आले होते त्यावेळी समाजाला विचारून एक महिना वेळ दिला. सग्या सोयऱ्याची व्याख्या, हैदराबाद, बॉम्बे आणि सातारा गॅझेट बाबत 13 तारखेपर्यंत निर्णय सरकार घेईल, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

मनोज जरांगे काय म्हणाले?

सरकारने जे दहा टक्के आरक्षण दिले होते आणि मुलांनी जे प्रमाणपत्र काढले होते. ते प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यास अडचण येत आहे. मराठा समाज पुरता अडचणी सापडला आहे. सरकारचा डाव आहे का की यावर्षी मराठा समाजाची पोरांची नुकसान करायची आणि याबाबत मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की अशी विद्यार्थ्यांना अडकाठी आणू नका, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलंय.

“13 तारखेपर्यंत आम्हाला…”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर समाजाने पुन्हा एकदा विश्वास ठेवला आहे आणि आणि 13 तारखेपर्यंत सग्या सोयऱ्याची अंमलबजावणी आमच्या व्याख्ये प्रमाणे करतील आणि हैदराबाद गॅझेट साठीही तीन पत्र दिल्याचे विधानसभेत शंभूराज देसाई यांनी सांगितलं आहे. 13 तारखेपर्यंत आम्हाला न्याय भेटेल आम्हाला विश्वास आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

सरकारने मुलींना मोफत शिक्षणाचा जो अध्यादेश काढलाय. त्याची अंमलबजावणी होत नाही. मग आदेश काढलाच कशाला? सरकार निर्णय घेतं. पण त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे मराठा समाज नाराज होत आहे. मुलींच्या बाबतीत मोफत शिक्षणाचा जो निर्णय घेतला आहे. त्याचा आज मुलींना फायदा होत नाही आणि जर कोणाला लाभ झाला असेल तर त्यांनी येऊन सांगावं, असंही मनोज जरांगे टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हणाले.

Non Stop LIVE Update
आमदार अपात्र प्रकरणात सुप्रीम कोर्टात निकाल, काय म्हणतात वकील
आमदार अपात्र प्रकरणात सुप्रीम कोर्टात निकाल, काय म्हणतात वकील.
माझा 'रन रेट' चांगलाय, पुढच्या लोकसभेला येथूनच लढतो - महादेव जानकर
माझा 'रन रेट' चांगलाय, पुढच्या लोकसभेला येथूनच लढतो - महादेव जानकर.
T20 वर्ल्ड कप परेड :'एवढी मोठी गर्दी पाहून हृदय...,' काय म्हणाले पोलीस
T20 वर्ल्ड कप परेड :'एवढी मोठी गर्दी पाहून हृदय...,' काय म्हणाले पोलीस.
निलेश लंके यांचे हमीभावासाठी आंदोलन, पत्नी आणि आईने चुल पेटविली
निलेश लंके यांचे हमीभावासाठी आंदोलन, पत्नी आणि आईने चुल पेटविली.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजने संदर्भात मंत्री तटकरे यांनी दिले आदेश
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजने संदर्भात मंत्री तटकरे यांनी दिले आदेश.
'मराठ्यांनो आरक्षण मिळेपर्यंत मला...,'अश्रू गाळीत मनोज जरांगे म्हणाले
'मराठ्यांनो आरक्षण मिळेपर्यंत मला...,'अश्रू गाळीत मनोज जरांगे म्हणाले.
'नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प...,' काय म्हणाले नितीन गडकरी
'नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प...,' काय म्हणाले नितीन गडकरी.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे नाव चंद्रकांत पाटील यांनी असं घेतलं..
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे नाव चंद्रकांत पाटील यांनी असं घेतलं...
'वेळ कशी कोणावर येते...,' क्लीन चिटवर काय म्हणाले रवींद्र वायकर
'वेळ कशी कोणावर येते...,' क्लीन चिटवर काय म्हणाले रवींद्र वायकर.
आगे आगे देखो होता है क्या,, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
आगे आगे देखो होता है क्या,, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा.