Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरपंच व्हायची ऐपत नाही, ते खासदारकीची स्वप्न पाहतायत, अर्जुन खोतकरांना कैलास गोरंट्याल यांनी पुन्हा डिवचलं

जालनाः शहरात आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या हस्ते दोन रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या कार्यक्रमात महाविकास आगडीत एकत्र असलेले जलन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांनी शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्यावर जोरदार टीका केली. खोतकरांचं नाव न घेता काय […]

सरपंच व्हायची ऐपत नाही, ते खासदारकीची स्वप्न पाहतायत, अर्जुन खोतकरांना कैलास गोरंट्याल यांनी पुन्हा डिवचलं
अर्जुन खोतकर, कैलास गोरंट्याल
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 5:05 PM

जालनाः शहरात आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या हस्ते दोन रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या कार्यक्रमात महाविकास आगडीत एकत्र असलेले जलन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांनी शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्यावर जोरदार टीका केली.

खोतकरांचं नाव न घेता काय म्हणाले गोरंट्याल?

कैलास गोरंट्याल म्हणाले, ‘ ज्यांची ग्रामपंचायतचा सरपंच व्हायची आयपत नाही आणि ते खासदार व्हायची स्वप्न बघतात’… असा टोला खोतकर यांना लगावला. आधी महिनाभरापूर्वी एका कार्यक्रमातही कैलास गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकरांवर टीका केली होती. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचं काम करत असलेल्या कान्ट्रॅक्टरला ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांची यादी असून गडकरी यांनी यादीतील नावं जाहीर करावी. ही नावं जाहीर झाली तर आणखी एखादी टीम घरी येईल, असाही टोला त्यांनी खोतकरांना लगावला होता. शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या घरावर काही दिवसांपूर्वी ईडीने छापा टाकला होता. त्यानंतर खोतकर यांनी दानवे यांनाच या कारवाईसाठी जबाबदार धरले होते. तसेच दानवे यांनीच रस्त्याच्या कामात घोटाळे केल्याच आरोप त्यांनी केला होता.

कट्टर काँग्रेसी- कैलास गोरंट्याल

जालन्यातील काँग्रेसचे बडे नेते आणि कट्टर काँग्रेसी अशी आमदार कैलास गोरंट्याल यांची ओळख आहे. तीन वेळा आमदार राहिलेल्या गोरंट्याल यांना ठाकरे मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता होती. परंतु त्यांची वर्णी लागली नाही. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी जालना मतदारसंघातून शिवसेनेचे नेते व माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचा पराभव केला होता. जालन्यात खोतकर विरुद्ध गोरंट्याल ही नेहमीच चुरशीची लढत होत असते.

इतर बातम्या-

अशोक चव्हाण हिंगोलीचं पाणी पळवतायत’ सर्वपक्षीय नेत्यांचा आरोप, शेकडो ट्रॅक्टरसह कळमनुरीत मोर्चा!

Nawab Malik : नवाब मलिकांचा एनसीबीवर पुन्हा गंभीर आरोप, अधिकारी आणि पंचांमधील कथित ऑडिओ क्लिपही जाहीर

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.