Video: शिवसेनेचे खोतकर म्हणाले, इन्शा अल्लाह हम तुम्हारे साथ है, भाषणाने जमाव भडकला? भरसभेतला तो व्हिडीओ चर्चेत
यातलं सर्वाधिक चर्चेत असलेलं भाषण आहे ते जालन्याचे शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांचं. त्यांच्या याच भाषणाने जमाव भडकला की काय असा सवाल आता सोशल मीडियावर केला जातोय. विरोधी नेतेही खोतकरांच्या भाषणावर बोट ठेवतायत.
नांदेड, अमरावतीसह महाराष्ट्रातल्या काही शहरात मुस्लिम मोर्चांना हिंसक वळण लागलं आणि बघता बघता त्या त्या शहरातली स्थिती तणावपूर्ण झाली. आता ही शहरं शांत आहेत. पण काही व्हिडीओ नव्यानं चर्चेत आलेत. यातले काही व्हिडीओ जमावानं कशी तोडफोड केली याचे आहेत तर काही नेत्यांच्या भाषणाची आहेत. यातलं सर्वाधिक चर्चेत असलेलं भाषण आहे ते जालन्याचे शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांचं. त्यांच्या याच भाषणाने जमाव भडकला की काय असा सवाल आता सोशल मीडियावर केला जातोय. विरोधी नेतेही खोतकरांच्या भाषणावर बोट ठेवतायत. हेच भाषण भाजप नेते नितेश राणेंनी रिट्विट केलं आहे.
काय म्हणाले नेमकं खोतकर? जालन्यात काल रजा अकादमीच्या वतीने मुस्लिम समाजाच्या धरणे आंदोलनात शिवसेनेचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी केंद्रातील सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले ‘जिथं कुराण जाळलं जाईल, जिथं मशिद तोडली जाईल, जिथं भगवद गीता तोडली जाईल,आपण सर्व जण एकत्र येऊन, ह्या धरतीमातेचे सुपूत्र म्हणून याविरोधात लढू. ह्या लढाईत आम्ही तुमच्या सोबत आहोत. धन्यवाद, इन्शा अल्लाह जे काही होईल आम्ही तुमच्यासोबत आहोत( जमावाच्या टाळ्या).’
Did Shiv Sena ex-minister @miarjunkhotkar actively provoke violence Muzlim mob during anti #Tripura rally? If yes then is this new version of #Hindutva? Will he clarify about this video? @mieknathshinde @NiteshNRane @Dev_Fadnavis @GopichandP_MLC @KiritSomaiya @priyankac19 + pic.twitter.com/PJ6nP9gQYC
— Legal Rights Observatory- LRO (@LegalLro) November 13, 2021
आणखी काय म्हणाले खोतकर? ‘त्रिपुरामध्ये मशिदीवर जो हल्ला करण्यात आला त्याचा सर्व प्रथम मी निषेध करतो. मशीदीवर हल्ला करण्यात आल्याने जालन्यामध्ये मुस्लिम बांधवांकडून आंदोलन करण्यात येत आहे, आणि या घटनेचा निषेध करण्यासाठीच मी आज या ठिकाणी आलो आहे. आपल्या सर्वांनाच माहित आहे की देशातील वातावरण गढूळ करण्याचे काम कोण करत आहे. देशात ज्यांची सत्ता आहे त्यांच्याकडून ही सर्व कामे सुरू आहेत. समाजविघातक कृत्य करून हिंदू, मुस्लिमांमध्ये भांडणे लावण्याचे काम काही गुंडांकडून सुरू आहे. या गुंडांना सध्या अभय मिळत आहे. हे कोण लोक आहे ते वेळीच ओळखा. हिंदू , मुस्लिम ही सर्व एकाच देवाची लेकरे आहेत. मग जर हिंदू अथवा मुस्लिम कोणत्याही धर्मातील लोकांवर अन्याय होत असेल तर त्यांच्यासोबत हा अर्जून खोतकर कायम उभा असेल’.
हे सुद्धा वाचा:
Chanakya Niti | सरळ सोप आयुष्य जगायचंय? मग आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 5 गोष्टी आत्मसात करा