Manoj Jarange | मराठ्यांचा सात बारा पक्का झाला, आता वळवळ करायची नाही, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
Manoj Jarange | मिळत कसं नाही, घेऊन दाखवलं, असा आत्मविश्वास शनिवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी दाखवला. वाशीत एकच जल्लोष झाला. रात्री जरांगे त्यांच्या गावी अंतरवाली सराटीत पोहचले. त्यावेळी त्यांनी एवढे मोठा कायदा झाला, यावर विश्वास बसत नसल्याची प्रतिक्रिया दिली.
जालना | 28 January 2024 : मराठा आरक्षणाचा मुद्दा मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरला. मुंबईच्या वेशीवर इतिहास घडला. वाशीत त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केले. त्याविषयीचा अध्यादेश जरांगे पाटील यांच्या हाती सुपूर्द केला. त्यावरुन आता राज्यात उलटसूलट चर्चा रंगल्या आहेत. प्रत्येक जण त्याच्या नजरेतून समीक्षा, मत, चर्चा करत आहे. पण मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना या विषयी काय वाटतं, त्यांनी प्रत्येक शब्दाचा कसा किस पाडला. कसे सरकारले बांधून घेतले, याची माहिती अंतरवाली सराटीत पोहचल्यावर दिली.
मी तर शब्द देऊन बसलो
अंतरवाली सराटीत पोहचल्यावर त्यांनी रात्री उशीरा माध्यमांशी आणि समाज बांधवांशी संवाद साधला.विश्वास बसत नाही एवढं मोठं कायदा पारित झाला.कायद्यात रूपांतर करण्यासाठी सरकारला अधिवेशन घ्यावे लागणार आहे. घटनातज्ञानी जे मत मांडलाय त्यानुसार हे समजून घेणे गरजेचे आहे. हा कायदा आयुष्यभरासाठी झाला. नोंदी मिळाल्या त्यांना आरक्षण मिळालं आहे. ज्याच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांचं कस हा मोठा चॅलेंज माझ्यासमोर होता, कारण मी शब्द देऊन बसलो होतो. सगे सोयरे या शब्दात मराठ्याचा किती हित आहे. हे मी आधीच हेरल होत..अंतरवालितून सुरू झालेली ही लढाई एवढी लांब जाईल वाटलं न्हवतं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
५७ लक्ष लोकांना आरक्षण
त्यांनी मराठा समाजाचे आभार मानले. मी म्हणालो मुंबई गल्ली गल्लीत जमा, खरंच गल्ली गल्लीत जमले. अहमदनगर पाऊण पुढे रोडच दिसला नाही, एवढ्या प्रचंड संख्येने लोक होती. पुण्यात ६४ किलोमीटर लाईन होती, असे जरांगे पाटील म्हणाले. लढा जिंकला, ५७ लक्ष लोकांना आरक्षण मिळालं. त्यानुसार आडीच लाख लोकांना फायदा मिळालं व आता कायदा पारित झालं व त्यामुळे उर्वरित मराठ्यांना देखील लाभ मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आताही आमचं बोलणं झालं आहे. फेब्रुवारीत अधिवेशन आहे, त्यावेळी कायदा पारित करू म्हणून शब्द दिल्याचे त्यांनी सांगितलं.
मराठवाड्यातील मराठ्यांच्या अडचणी संपणार
जरांग पाटील म्हणाले की, आणखीन एक गोष्ट बांधून घेतली. मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या. या कायद्याविषयी कितीही गैरसमज झाले तरी कुणीही चॅलेंज करू शकत नाही. मी सर्व अभ्यासक, तज्ञ, वकील बोलावले व सर्वांनी शब्दाचा किस पाडला व याला काहीच होऊ शकत नाही असे म्हटले. समाजासाठी हा कायदा खूप मोठा झाला आहे. या कायद्यातून मराठ्यांच्या पोरांचं भविष्य कुणीही थांबू शकत नाही. मराठवाड्यातील मराठ्याच्या अडीअडचणी देखील संपणारा आहेत.सगळ्या बाजूने मराठा आत गेला पाहिजे. काल सात शासन निर्णय झालेत. या कायद्याला काहीच होत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्यांच्याकडे लक्ष देण्याची नाही गरज
मंत्री छगन भुजबळ आणि सदावर्ते यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. तो त्यांचा धंदाच आहे. त्यांनी सांगितलेले सर्व खोटं आहे. घटनातज्ज्ञ काय सांगतात, ते महत्वाचे आहे. ते वाया गेलेले लोक आहे, ते जे सांगितील, त्याच्या नेमकं उलटं धरायचं असा टोला त्यांनी हाणला. कायदा पारित झाला तो मराठ्याच्या हिताचा आहे.मराठ्यांचा सात बारा पक्का झाला, आता वळवळ करायची गरज नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
अंतरवाली सराटीत बैठक
मराठा आरक्षणाची पुढील दिशा ठरवण्यासाठी अंतरवाली सराटीत दुपारी १२ वाजता बैठकी घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. या बैठकीत पुढचा निर्णय घेण्यात येणार आहे. यावेळी त्यांनी सर्व समाज बांधवांचे, उपोषणकर्त्यांचे आभार मानले. त्यांनी अंतरवाली सराटीला बैठकीला येण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.