मनोज जरांगे पाटलांनी सस्पेन्स ठेवला कायम; किती जागांवर लढणार याची घोषणा आता 3 तारखेला, आजच्या बैठकीत झालं काय?

Manoj Jarange Patil : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मराठा फॅक्टरची चर्चा देशभर होत आहे. लोकसभेत या फॅक्टरने मोठा हिसका दाखवल्याने निवडणुकीच्या तोंडवर राजकीय पक्ष सावध भूमिका घेत आहेत. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात अंतरवाली सराटीत आज सभा झाली. त्यात किती जागांवर निवडणूक लढवणार हे त्यांनी गुलदस्त्यात ठेवले.

मनोज जरांगे पाटलांनी सस्पेन्स ठेवला कायम; किती जागांवर लढणार याची घोषणा आता 3 तारखेला, आजच्या बैठकीत झालं काय?
मनोज जरांगे पाटील
Follow us
| Updated on: Oct 31, 2024 | 3:01 PM

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. अनेक मुद्यांभोवती ही निवडणूक फिरत आहे. त्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. लोकसभेत मराठा फॅक्टरने सत्ताधाऱ्यांना मोठा झटका दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पण या निवडणुकीत मोठा उलटफेर करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी काही जागांवर उमेदवार देण्याचे स्पष्ट केले होते. त्यांनी या जागांवर इच्छुक उमेदवारांनीच त्यांच्यातून एक उमेदवार देण्याचे आवाहन केले होते. त्यांनी 31 ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटीत खास बैठक बोलवली होती. या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. ते किती मतदारसंघात उमेदवार देणार याविषयीचा सस्पेन्स त्यांनी कायम ठेवला. आता याविषयीचा खुलासा ते 3 नोव्हेंबर रोजी करणार आहेत.

आता त्यांना संपवायचं

आम्हाला संपवायला निघालेल्यांना आम्हाला संपवायचं आहे. त्यांचं राजकीय करिअर संपवायचं आहे. लोकशाही प्रमाणे आम्ही हा उचलेला विडा आहे. तो पण आम्ही कडेला न्यायचं ठरवलं आहे. राज्य आणि राज्याच्या बाहेरचे लोक जे सुंदर स्वप्न पाहात होते ते आज साकार झालयं. दलित, मुस्लिम मराठा एकत्र आले आहेत. या सर्वांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली आहे. समीकरण झाल्याशिवाय मनातून तुम्ही बदल करू शकता पण परिवर्तन करू शकत नाही. बदल होत असतो. पण परिवर्तन होत नसतं. परिवर्तनासाठी आजचा दिवस चांगला आहे. दलित, मुस्लिम मराठा एकत्र आल्याशिवाय परिवर्तन होणार नाही असं सांगत होतो, ते आज झालं. आमचं समीकरण पक्कं झाल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

दलित-मुस्लिम-मराठा एकत्र

आधी आमच्यासाठी कर्तव्य होतं जो समोर अन्यायासाठी आक्रोश करतोय त्यांच्या वेदना आणि आक्रोश जाणून घेणं हे आमचं काम होतं. ७५ वर्षात जे समीकरण जुळणार नव्हतं ते आज एकमतानं नाही, बहुमताने पक्कं झालं आहे. आम्ही तिघं आज एकत्र आलोय. आमच्या चर्चेतून सर्व प्रश्न झाले. शेतकरी, ओबीसी, मराठा, मुस्लिम, महिलांचे सर्व प्रश्नावर आम्ही चर्चा केली. धर्मावरही चर्चा झाली. मी हिंदू आहे. त्यांचा इस्लाम आहे. यांचा बौद्ध धर्म आहे. आपण एकमेकांच्या धर्मात ढवळाढवळ करायची नाही. , असे आवाहन त्यांनी केले.

आता निर्णय 3 नोव्हेंबरला

सगळ्या जाती धर्मासाठी दोन दिवस गॅप ठेवला आहे. लिंगायत, बंजारा, ओबीसी, धनगर समाजाचे धर्मगुरू आहेत. महानुभवपंथांचे धर्मगुरू आहेत. वारकरी संप्रदायाचे आहेत सर्व येणार आहेत. त्या सर्वांनी यावं म्हणून आम्ही तीन चार दिवसाचा गॅप ठेवला आहे. आज आमचं ओरिजिनल शिक्कामोर्तब झालंय. मराठा, दलित मुस्लिम एकत्र आला. जागा किती लढायच्या याची घोषणा ३ तारखेला करणार आहे. उमेदवार कोण हे जाहीर करणार आहोत. आम्ही उमेदवाराबाबत काही लावून धरणार नाही. यांनी आम्हाला खूप त्रास दिला. आम्हाला त्रास दिला. आमच्या लोकांना त्रास दिला. ज्यांनी सत्तेवर बसवलं. त्यांच्या डोक्यात पोटात गोळ्या घातल्या, असा आरोप त्यांनी केला.

Non Stop LIVE Update
...म्हणून रवी राजांचा भाजपात प्रवेश, वर्षा गायकवाडांनी सांगितलं कारण
...म्हणून रवी राजांचा भाजपात प्रवेश, वर्षा गायकवाडांनी सांगितलं कारण.
'शिंदेंनी माझा घात केला नाहीतर...', बेपत्ता असलेले वगना काय म्हणाले?
'शिंदेंनी माझा घात केला नाहीतर...', बेपत्ता असलेले वगना काय म्हणाले?.
'आपला भाऊ पुन्हा...', लाडक्या बहिणींना शिवसेनेच्या बड्या नेत्याच आवाहन
'आपला भाऊ पुन्हा...', लाडक्या बहिणींना शिवसेनेच्या बड्या नेत्याच आवाहन.
शिंदेंसारखं मी पक्ष-चिन्ह ढापलं नाही, म्हणून.., राज ठाकरे काय म्हणाले?
शिंदेंसारखं मी पक्ष-चिन्ह ढापलं नाही, म्हणून.., राज ठाकरे काय म्हणाले?.
मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, 'या' बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश
मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, 'या' बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश.
रस्त्यावर सापडताय 500 रूपयाच्या नोटा, रस्त्यावर पैसे अन् चर्चांना उधाण
रस्त्यावर सापडताय 500 रूपयाच्या नोटा, रस्त्यावर पैसे अन् चर्चांना उधाण.
उद्धव ठाकरे यांच्या स्टार प्रचारकात कोण-कोण? 'या' चेहऱ्यांवर भरवसा
उद्धव ठाकरे यांच्या स्टार प्रचारकात कोण-कोण? 'या' चेहऱ्यांवर भरवसा.
एकाच नावाचे अनेक डमी उमेदवार, अपक्षांनी वाढवली उमेदवारांची डोकेदुखी
एकाच नावाचे अनेक डमी उमेदवार, अपक्षांनी वाढवली उमेदवारांची डोकेदुखी.
दादांचे उमेदवार तिथं शिंदेंकडून एबी फॉर्म, कुठे रंगणार दोस्तीत कुस्ती?
दादांचे उमेदवार तिथं शिंदेंकडून एबी फॉर्म, कुठे रंगणार दोस्तीत कुस्ती?.
सिंचनाच्या फाईलमुळे कोण अडकणार? दादांसह फडणवीसांवर गुन्हा दाखल होणार?
सिंचनाच्या फाईलमुळे कोण अडकणार? दादांसह फडणवीसांवर गुन्हा दाखल होणार?.